Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांची माफी मागा; अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू : चिवडशेट्टी

सहकारमंत्र्यांची माफी मागा; अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू : चिवडशेट्टी

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:27PM सोलापूर : प्रतिनिधी 

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न केला असून याचा आधार घेऊन काँग्रेसची काही नेतेमंडळी आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दक्षिण सोलापूर तालुक्याचे भाजप अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी माजी आ. दिलीप माने यांचे नाव न घेता केला आहे.
ना. सुभाष देशमुख यांनी कोणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही. उलट, प्रसारमाध्यमांनी त्याचा विपर्यास करून प्रसिद्धी केली आहे. त्याचा आधार घेऊन काँग्रेसची काही नेतेमंडळी आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत व खालच्या स्तरावर जाऊन ना. सुभाष देशमुख यांच्यावर आरोप करत आहेत. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी अनेक आरोप केले आहेत. त्या लोकांनी सहकारमंत्री देशमुख यांची तत्काळ माफी मागावी; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. जर येत्या दोन दिवसांत 
संबंधितांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे चिवडशेट्टी म्हणाले.

ना. देशमुख यांची प्रतिमा स्वच्छ असताना बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसचे हे षड्यंत्र असून त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा उत्तर सोलापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी दिला आहे. 

यावेळी नगरसेविका शैलजा राठोड, सभापती अश्‍विनी जाधव, संतोष भोसले, इंद्रजित पवार, नागेश वल्याळ, श्रीमंत बंडगर, संभाजी भडकुंबे, अमोल सुतार, अतुल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.