Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Solapur › ..तर अधिष्ठातांना कॉलेजमध्ये पाय ठेवू देणार नाही : भैया देशमुख

..तर अधिष्ठातांना कॉलेजमध्ये पाय ठेवू देणार नाही : भैया देशमुख

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 8:35PMसोलापूर : प्रतिनिधी

सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधील कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, अधिष्ठाता वेळेवर पगार घेतात. मात्र हातावर पोट असणार्‍या रोजंदारी कर्मचार्‍यांचे तीन-तीन महिने वेतन अदा होत नाही. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्‍न त्वरित मार्गी न लावल्यास अधिष्ठातांना मेडिकल कॉलेजमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचे भैया देशमुख यांनी सांगितले.

जि. प. आरोग्य विभागातील 102 या अ‍ॅम्ब्युलन्सच्या वाहनचालकांचा पगार 6 ते 8 महिन्यांपासून होत नव्हता.  त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून प्रश्‍न सोडवला आहे. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत दीडशेपर्यंत रोजंदारी कर्मचार्‍यांचा वेतनाचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे यामध्येही भै या देशमुख यांनी रोजंदारी कर्मचार्‍यांच्या बाजूने प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत सोलापूरचेच राज्य आरोग्यमंत्री विजयकुमार देशमुख यांना रोजंदारी कर्मचार्‍यांनी निवेदन देऊनही प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा भेटून प्रश्‍न सोडवण्यासाठी निवेदन देणार आहे. अन्यथा रोजंदारी कर्मचार्‍यांना घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांना दिला आहे.