Fri, Jul 19, 2019 22:08होमपेज › Solapur › कॅसल ग्रीन मंगल कार्यालयातील अवैध बांधकाम जमीनदोस्त

कॅसल ग्रीन मंगल कार्यालयातील अवैध बांधकाम जमीनदोस्त

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 9:05PMसोलापूर : प्रतिनिधी

 कॅसल ग्रीन मंगल कार्यालयातील अवैध बांधकाम महापालिका अधिकार्‍यांच्यावतीने जमीनदोस्त करण्यात आले. कोर्टाकडून कोणत्याही प्रकारची स्थगिती आणू नये म्हणून मनपाने अगोदरच कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केले होते.

कॅसल ग्रीन मंगल कार्यालयाला क्लब हाऊसची परवानगी आहे.त्यामध्ये अवैधरित्या मंगल कार्यालय चालविण्यात येत असल्याची माहिती तक्रारदार  अंगद   देवकते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. मनपाच्या अधिकार्‍यांना विचारले असता दिलीप बाबुराव चव्हाण यांच्या नावे होटगी रोड येथील औद्योगिक वसाहतीशेजारील जागेवर कॅसल ग्रीन क्लब हाऊसची परवानगी सोलापूर महानगरपलिकेत नोंद आहे. या जागेवर ज्या बांधकामाची परवानगी नाही त्या जागेवरील अवैध बांधकाम पाडण्यात आले आहे, असे ज्युनिअर इंजिनिअर एस.व्ही. एकबोटे यांनी सांगितली.

बुधवारी सकाळी साडेअकराच्या  मनपा बांधकाम खात्यातील अधिकारी नजीर शेख, सरफराज सय्यद आपल्या कर्मचार्‍यांसोबत कॅसल ग्रीन येथील अवैध बांधकाम पाडण्यास आले होते. पाडकाम करताना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. जेसीबी व हातोड्याच्या सहाय्याने पाडकामास सुरुवात झाली.

तक्रारदार अंगद एकबोटे यांनी लोकशाहीदिनात वेळोवेळी याविरोधात सोलापूर महानगरपालिकेत तक्रार दाखल  केली होती. या जागेच्या  आजूबाजूस राहावयासाठी असलेल्या 67  प्लॉटधारकांना  क्लब हाऊस म्हणून उपयोगात आणावी, अशी मान्यता देण्यात आली आहे. परंतु त्याजागी मंगल कार्यालय चालविले जात आहे, अशी लेखी तक्रार मनपात करण्यात आली होती. एक महिन्यापूर्वी या जागेवरील अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. अखेर बुधवारी कारवाई झाली.