होमपेज › Solapur › सोलापूर : दुहेरी बस अपघातात १४ प्रवाशी जखमी

सोलापूर : दुहेरी बस अपघातात १४ प्रवाशी जखमी

Published On: Feb 14 2018 3:44PM | Last Updated: Feb 14 2018 3:44PMटेंभुर्णी :  परिवहन महामंडळाच्या बसने मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.  या भीषण अपघात बसमधील १४ प्रवाशी जखमी झाले असून यातील तीन प्रवाशी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पुणे - सोलापूर महामार्गावर वरवडे टोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी १२.३० वा. च्या सुमारास झाला आहे.

उमरगा ते पुणे (क्र. एम.एच-१४ बीटी-३९०२) ही परिवहन महामंडळाची बस ४५ प्रवाशी घेऊन बसचा चालक नामदेव खिचडे, व वाहक डी. बी. दडस हे ठाणे येथे निघाला होते. बस माढा तालुक्यातील वरवडे टोल नाक्याजवळ आली असता बसची मालट्रकला (क्र--टी.एन-५२,सी-३८९९) पाठीमागून जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा मोठा होता की, यामुळे बसमधील सुमारे २५ प्रवाशी समोरील बाकड्यास धडकुन जखमी झाले. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी बसमधील १४ ते १५ प्रवाश्यांना वेगवेगळ्या वाहनातून  उपचारासाठी हलविले. यामधील तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. बाकीचे किरकोळ जखमी प्रवाशी निघून गेले. या अपघातात दुसरी बस मुरूम-चिंचवड (क्र. एम.एच-१४,बीटी-४६१०) या बसला ही पाठीमागील बाजूस धक्का लागला. यामुळे या बसमधील प्रवाशी दुसऱ्या वाहनाने पाठविण्यात आले.

वरवडे टोल नाका येथे मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस वाहने अडवून एन्ट्री वसुली करीत होते. यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा उपस्थितांतून करण्यात येत होती.पोलिसांनी थांबविलेला मालट्रक अचानक समोर आला. तसेच दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती समोर आला यामुळेच हा अपघात घडला आहे. या अपघातात बसचे सुमारे ५० ते ६० हजार रुपयाचे नुकसान  झाले आहे.