Sun, May 19, 2019 14:35
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › भीमा-कोरेगाव दंगल करणार्‍यांच्या अटकेसाठीमोर्चा 

भीमा-कोरेगाव दंगल करणार्‍यांच्या अटकेसाठीमोर्चा 

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:21PM कुर्डुवाडी : प्रतिनिधी  

भीमा-कोरेगाव येथील दंगल घडवणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही, तरी या दोघांना अटक करून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी व दंगल घडविणे हा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइंच्यावतीने  कुर्डुवाडी येथे काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आली.

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र रिपाइंचे अध्यक्ष बाबासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कॉलनी ते प्रांत कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे निवेदन उपजिल्हाधिकारी बोरकर व पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी स्वीकारले. यावेळी रिपाइंचे पश्‍चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ, तालुकाध्यक्ष राम जगताप, नगरसेवक सूरज जगताप, अमर बडेकर, बंडू भोसले, बाबासाहेब शेंडगे, अण्णासाहेब वाघमोडे, अफसर मुलाणी, सुभाष जानराव, धनंजय शेंडगे, भीमराव वजाळे, प्रशांत तापकिरे, रोहित ओहोळ, अभिमान गायकवाड, गणेश गोरे, संतोष शेंडगे, भागवत बनसोडे, राजाभाऊ दणाणे, समद मुलाणी, कृष्णा अस्वरे, विक्रांत मोरे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते.