Sun, Feb 24, 2019 11:10होमपेज › Solapur › उजनीतून कालव्यात सोडण्यात येणार्‍या विसर्गात  वाढ

उजनीतून कालव्यात सोडण्यात येणार्‍या विसर्गात  वाढ

Published On: Aug 02 2018 6:53PM | Last Updated: Aug 02 2018 6:53PMबेंबळे  : वार्ताहार 

उजनीतून  शेतीसाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या विसर्गात आज वाढ करण्यात आली आहे. काल उजनीच्या मुख्य कालव्यातून 300 क्युसेक ने ,बोगद्यातून 100 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. त्यात टप्याटप्याने वाढ करत आज सायंकाळ पर्यंत त्‍यात 2000 क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात पुन्हा वाढ करत तो 3000 क्युसेक करण्यात येणार आहे.

उजनी प्रकल्पात सद्यस्थितीत 34 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे. मात्र सध्या उजनी लाभक्षेत्र परिसरात पावसाचा खंड पडल्यामुळे पिके करपू लागली होती. या सर्व बाबींचा विचार करुन धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती त्यानुसार पाणी सोडण्यासाठी लवा सल्लागार समितीची बैठक होवून निर्णय होण्यास काही अवधी लागणार होता, तथापी, जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती व गांभीर्य पाहून पालकमंत्री  देशमुख यांनी तातडीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क साधून त्यांना सविस्तर माहिती दिल्‍याने त्‍यांनी  उजनीतून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. 

सीनामाढा उपसा सिंचन चालू होणार

उजनी धरणातुन कालवा व बोगद्यातुन पाणी सोडल्यानंतर सीनामाढा उपसा सिंचन योजना दोन दिवसात कार्यांन्वित करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
सध्या उजनी धरणात दौंड येथुन येणाऱ्या विसर्गात घट झाली आहे. वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतल्याने हा विसर्ग कमी होत गेला. त्यामुळे सध्या 1729 क्युसेक विसर्ग चालु आहे.

येणारे 1729 क्युसेक तर उजनीतुन जाणारे 2100 क्युसेक असल्याने आता उजनी पाणीपातळीत हळहळु घट होत जाणार हे नक्की 
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी पुढीलप्रमाणे .
एकूण पाणिपातळी ...493.410 मी.
एकूण पाणिसाठा ...2328.09 दलघमी 
उपयुक्त पाणिसाठा 525.28 दलघमी 
टक्केवारी ...34.62%
विसर्ग ..
दौंड 1729क्युसेक 
बंडगार्डन 2916. क्युसेक 
उजनीतून
कालवा..2000 क्युसेक 
बोगदा ..100 क्युसेक