Wed, Nov 21, 2018 17:25होमपेज › Solapur › सोलापूर : हाणामारीप्रकरणी पोलिसासह चौघांवर गुन्हा

सोलापूर : हाणामारीप्रकरणी पोलिसासह चौघांवर गुन्हा

Published On: Feb 19 2018 4:01PM | Last Updated: Feb 19 2018 4:01PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरातील कविता नगर  पोलिस  वसाहतीमध्ये घरगुती भांडणातून पोलिस कर्मचारी व त्याच्या नातेवाईकांमध्ये चाकूने हाणामारी झाली. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात  पोलिस कर्मचार्‍यासह चौघांविरुध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस शिपाई तानाजी शिवाजी इंगोले (वय 32, रा. कवितानगर पोलिस वसाहत, रविवार पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन सागर महादेव पवार, लक्ष्मण दत्तात्रय पोळ (रा. घेरडी, ता. सांगोला), सुधाकर दत्तात्रय पोळ (रा. वृंदावन सोसायटी, नेहरूनगर, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लक्ष्मण दत्तात्रय पोळ (रा. घेरडी) याच्या फिर्यादीवरून पोलिस शिपाई तानाजी इंगोल याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.