Wed, Feb 20, 2019 18:54होमपेज › Solapur › सोलापूर : मायलेकीचा बुडून  मृत्यू

सोलापूर : मायलेकीचा बुडून  मृत्यू

Published On: Feb 04 2018 5:47PM | Last Updated: Feb 04 2018 5:47PMबार्शी : प्रतिनिधी

शेतात महिला मजुरांना पिण्यासाठी पाणी आणायला विहिरीवर गेलेल्‍या महिलेचा विहिरीत बुडून मृत्‍यू झाला.यावेळी आपल्‍या आईला वाचवण्यासाठी गेलेल्‍या मुलीचाही बुडून दुर्दवी मृत्‍यू झाला. ही घटना शनिवार ३ फेब्रुवारी रोजी कारी, ता. बार्शी शिवारातील एका विहिरीत घडली.

शेतात खुरपणीचे काम सुरू असल्यामुळे महिला मजुरांना पिण्यासाठी पाणी आणायला गेलेल्‍या आशाबाई तात्यासाहेब कदम (वय ४०) यांचा विहिरीत पडून मृत्‍यू झाला. दरम्‍याने आपल्‍या आईला वाचविण्यासाठी गेलेल्‍या पूजा तात्यासाहेब कदम (वय १५) या मुलीचा बुडून दुर्दवी मृत्‍यू झाला. या दोघी मायालेकी उस्मानाबाद जिल्ह्यातील भानसगाव  (ता.जि.उस्मानाबाद) येथील रहिवासी आहेत. याबाबत शनिवारी रात्री उशिरा पांगरी पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दोघा मायालेकींचा अशा प्रकारे मृत्‍यू झाल्‍याने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.