Mon, Aug 19, 2019 18:00होमपेज › Solapur › सोलापूर : बाजार समितीच्या एका हिशोबाचे पाचवेळा ऑडीट

सोलापूर : बाजार समितीच्या एका हिशोबाचे पाचवेळा ऑडीट

Published On: Jun 29 2018 12:45PM | Last Updated: Jun 29 2018 12:45PMसोलापूर : प्रतिनिधी

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या 39 कोटीचा घोटाळा ऑडीटने समोर आणला. न्यायालयीन आदेशानुसार बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव माने यांनी 39 कोटी रुपयांचा हिशोब शेतकर्‍यांसाठी दिला. सहकारमंत्र्यांच्या ऑडीटला माने यांनी ऑडीटनेच उत्तर दिल्याने बाजार समितीची निवडणूक रंगतदार ठरली आहे. एकाच वर्षातील हिशोबाची पाच वेळा तपासणी केल्यानंतर यात काहीच न निघल्याची भूमिका माने यांनी घेतली आहे. सहकार मंत्र्यांना याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. 

39 कोटीच्या त्या निधीबाबात अशी आहे दोघांची भूमिका 

ऑडीट पाईंट : कामगारांच्या पगारात 4 कोटी 63 लाखाचा गैरप्रकार 
दिलीप माने यांचे ऑडीट : बाजार समितीत 2012 पर्यंत 126 कामगार होते. त्यानंतर कै. भिमराव पाटील यांच्या कार्यकाळात 59 कर्मचारी कायम केले. 2012 मध्ये औदयोगिक न्यायालयाच्या आदेशानुसार 59 कामगार कायम केले. न्यायालयाच्या आदेशानुसार यांचा पगार व सानुग्रह अनुदानासाठी 4 कोटी 63 लाख रुपये  खर्च करण्यात आला. यात कोणताच गैरप्रकार नाही.

ऑडीट पाईंट : जाहिरात खर्च विनाकारण करुन गैरप्रकार केला
दिलीप माने ऑडीट : शेतकर्‍यांच्या मालास योग्य भावा मिळावा, कांदा बाजार व आंबा बाजाराची माहिती अन्य राज्यात व अन्य जिल्ह्यात पोचण्यासाठी जाहिरात केली.त्याची जीएसटीसहीत बीले आहेत. जाहिरातीमुळे बाजार समितीची उलाढाला मोठी झाली, यात गैरप्रकार कोणताच झाला नाही. 

ऑडिट पाईंट  : व्यापार्‍याकडून रक्कम वसूल केली 
दिलीप माने : बाजार समितीचे व्यापारी हे बाजार फी व देखरेख फी हे माल खरेदीदाराकडून वसूल करुन घेतात, त्याचा भरणा हा परवानाधारक नूतनीकरण करताना करतो, ही पध्दत वर्षानुवर्षे चालत आली आहे. व्यापार्‍यांनी रक्कम भरल्यानंतरच त्यांना परवाना नुतनीकरण होता. या रक्कमेवर व्याज वसूल केला नाही, असा आरोप ठेवलेला चुकीचे आहे. यात कोणताच गैरप्रकारझाला नाही. 

ऑडीट पाईंट  : रेडिरेकनर दराने भाडे वसूल केले नाही.
दिलीप माने : खुल्या जागेतील व छोट्या व्यापार्‍यानी वापलेल्या जागेसाठी नाममात्र दराने त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे. मात्र 2018 च्या रेडिरेकनर दराप्रमाणे भाडे वसूल न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यात कोणताच गैरप्रकार नाही. खाली पोत्यावर किरकोळ भाजी विक्रेत्याकडून भाडे वसूल केला नाही, असाही चुकीचा आरोपा करण्यात आल्याची भूमिका माने यांनी घेतली आहे. 

ऑडीट पाईंट  : गाळे वितरणात गैरप्रकार 
दिलीप माने : 3 गाळेधारकांडून भाडे घेतले नसल्याचा आरोप आहे, मात्र त्यांच्याकडून भाडे घेण्यात आले आहे. रेडीरेकनर दराने भाडे वसूल न केल्याचा चुकीचा आरोप ठेवून गैरप्रकार केल्याचे दाखविण्यात आले आहे. हितसंबधातील व्यक्तींना 100 गाळे वाटप केल्याचाही आरोप आहे, मात्र एकाही हितसंबधाचे नाव नमूद नाही. त्यामुळे हा आरोपही चुकीचा आहे. 

ऑडीट पाईंट  : पाण्याच्या टाकी खरेदीत गैरप्रकार 
दिलीप माने : दुष्काळी काळात ग्रामिण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी 200 टाकी वाटप करण्यात आले आहे. स्वनिधीतून हा खर्च करण्यात आला आहे. दरपत्रक न मागविता हा खर्च केल्याचा आरोप आहे, वास्तविक पाहता यासाठी अत्यंत चांगल्या दर्जाचे टाकी घेण्यात आले असून टाकी पुरवठा करणारा ठेकेदार आपल्याचा राज्यातला कंजुष चेअरमन म्हणून टिका केली असल्याची भूमिका माने यांनी आपल्या ऑडीटमध्ये घेतली आहे. 

ऑडीट पाईंट : भरतीत घोटाळा 
दिलीप माने : कामगार भरती 2011 पुर्वीची आहे. असे असतानाही त्यांच्या वेतनावर करण्यात आलेला 11 कोटी 82 लाखाचा खर्च हा गैरव्यवहार म्हणून दाखविण्यात आला असून यात कोणताही गैरप्रकार नसल्याचे माने यांनी भुमिका घेतली आहे. 

ऑडीट पाईंट : बँक ठेवीतील गैरप्रकार 
दिलीप माने : कमी व्याजदाराने बाजार समितीच्या ठेवी ठेवल्याचा आरोप आहे, मात्र माने बँकेत ठेवलेल्या 49 कोटीच्या ठेवी मुदतीपुर्व काढण्यात आले, यामुळे बाजार समितीचे प्रशासकाने उलट 4 कोटीचा नुकसान केल्याची भुमिका माने यांनी घेतली आहे. या ठेवी कॅनरा बँकेत ठेवून, त्या ठेवीवर सहकार मंत्र्यांच्या संस्थाना कर्ज  घेण्यात आल्याचेही माहिती माने यांनी त्यांच्या ऑडीटने जनतेला दिला आहे.