Mon, Jun 17, 2019 03:25होमपेज › Solapur › ‘अटलजी अमर रहे’! सोलापूरकर भावविवश!!

‘अटलजी अमर रहे’! सोलापूरकर भावविवश!!

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:16PMसोलापूर : प्रतिनिधी 

‘अमर रहे, अमर रहे’ च्या घोषणांनी आज सोलापूर रेल्वे स्टेशनचा परिसर दुमदुमून गेला. एखाद्या व्हीआयपी माणसाच्या स्वागतासाठी जितकी गर्दी होत नाही, तितकी गर्दी अटलजींच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी भल्या सकाळी सोलापूर रेल्वेस्थानकावर झाली.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश आज सकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरात आणला. रेल्वेस्थानकाच्या बाहेर उघड्या फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून अस्थिकलशाची यात्रा काढण्यात आली. महापौर बंगला, डफरीन चौक, महानगरपालिका, चार हुतात्मा चौक, सरस्वती चौक मार्गे शिवाजी चौकाला वळसा घालून पुन्हा नवी पेठ जवळील राजवाडे चौकात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर यात्रा आली. पिवळ्या-पांढर्‍या फुलांनी सजविलेल्या मंचाच्या मधोमध अटलजींची मोठी प्रतिमा, अशा  सजावट करण्यात आलेल्या मंचावर अटलजींचा अस्थिकलश दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत हा अस्थिकलश लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. अटलजींच्या अस्थिंचे दर्शन घेण्यासाठी सोलापूरकरांनी अलोट गर्दी केली होती. याप्रसंगी अनेकांना भावना अनावर झाल्याचे चित्र होते.

यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, उपमहापौर शशीकला बत्तुल, सभागृहनेता संजय कोळी, नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले, डॉ.किरण देशमुख, राजू पाटील, सचिन कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष राजशेखर पाटील, बिज्जू प्रधाने, नागेश भोगडे, नगरसेवक शिवानंद पाटील, रवी कैय्यावाले, विनायक विटकर, प्रशांत फत्तेपूरकर, भैय्या बनसोडे, महांतेश झेंडेकर, प्रसाद कुलकर्णी, देविदास चेळेकर, नगरसेवक सुनील कामाठी, अविनाश पाटील, नगरसेवक शालन शिंदे, गीता पाटोळे, नगरसेविका अंबिका पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.