Mon, Jun 17, 2019 00:47होमपेज › Solapur › सहा. पोलिस आयुक्‍त डॉ. दीपाली काळे व परशराम पाटील आयुक्‍तालयात रूजू

सहा. पोलिस आयुक्‍त डॉ. दीपाली काळे व परशराम पाटील आयुक्‍तालयात रूजू

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 10:42PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. दीपाली काळे व परशराम पाटील हे सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयामध्ये रुजू झाले. डॉ. काळे या सांगली येथून, तर पाटील हे पुणे येथून बदलून आले आहेत. डॉ. दीपाली काळे या मूळच्या सांगलीच्या असून त्या सन 2011 मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून पोलिस दलामध्ये रुजू झाल्या. त्यांनी प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून नंदूरबार येथे काम केले. त्यानंतर रत्नागिरी-चिपळूण, कोल्हापूर, सांगली येथे उपअधीक्षक म्हणून काम केले आहे. सांगली येथील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा प्रारंभी त्यांनी तपास केला आहे.

डॉ. काळे  यांचे वैद्यकीय

क्षेत्रातील शिक्षण झाले आहे. तर परशराम पाटील हे मूळचे इंचलकरंजी येथील असून ते सन 1988 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी मुंबई, पुणे, सातारा, सांगली येथे काम केले आहे.