Thu, Jan 17, 2019 04:55होमपेज › Solapur › राजीनामा मंजूर करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही : आमदार भालके(Video)

राजीनामा मंजूर करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही : आमदार भालके(Video)

Published On: Jul 29 2018 6:28PM | Last Updated: Jul 29 2018 6:28PMसोलापूर : प्रतिनिधी 

राज्यातील 25 आमदारांनी आत्तापर्यंत विधानसभा अध्यक्षांना राजीनामे दिले आहेत, मात्र एकाही आमदाराचा राजीनामा  मंजूर करण्याचे  धाडस हे दाखवून शकले नाहीत कारण राजीनामे मंजूर केले तर उभा महाराष्ट्र पेटून उठेल याची भिती राज्य सरकारला आहे. राजीनामा मंजूर करण्याची हिम्मत नसेल तर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे आव्हान आज आमदार भारत भालके यांनी दिले. सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रुपा भवानी मंदिरामध्ये आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलीप माने, क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण,  दास शेळके, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते.

प्रारंभी रुपा भवानी देवीची आरती आमदार भालके, माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या पटांगणात टाकलेल्या मोठ्या मंचावर मांडण्यात आलेल्या देवीच्या जागरण गोंधळाची पूजा बांधण्यात आली तेथे नारळ वाढवून गोंधळाला सुरवात करण्यात आली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुर शिंदे यांनीही या आंदोलनाला भेट दिली. राज्यभर इतके मोठे आंदोलन होत असताना सरकारने यावर तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षासह मी स्वतः मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे असेही त्यांनी या आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.