होमपेज › Solapur › सोलापूर : शिलाई मशिनच्या धारदार सुईने कपबशीचा चुराडा; माने गटाची विजयाकडे घोडदौड

शिलाई मशिनच्या सुईने कपबशीचा चुराडा

Published On: Jul 03 2018 12:35PM | Last Updated: Jul 03 2018 7:02PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पॅनल पराभवाच्या छायेत तर कॉंग्रेसचे दिलीप माने यांचे पॅनल विजयाच्या मार्गावर आहे. त्यामुळे शिलाई मशिनच्या धारदार सुईने कपबशीचा चुराडा केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलच्या विरोधात भाजपचेच पालमंत्री उभे राहिल्याने सुभाष बापूंना त्याच ठिकाणी पहिला धक्का बसला. कुंभारी गटातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विजयाने दिलीप माने गटाने बाजार समितीवर विजयाचा श्रीगणेशा केला. त्यांचे विरोधक  शिरीष पाटील आणि विजयकुमार हत्तूरे हे पराभूत झाले. नान्नज गटातून माने गटाचे प्रकाश चोरेकर यानी देशमुख गटाचे अत्यंत विश्वासू इंद्रजीत पवार यांचा तब्बल १८७ मतांनी पराभव केला आहे. मंदृप गटात माजी सभापती इंदुमती अलगोंडा अघाडीवर असून पाकणीतून प्रकाश वानकर यांनी देशमुख गटाच्या सुनिल गुंड यांना पिछाडीवर टाकले आहे. 

आघाडीवर असलेले दिलीप माने गटाचे उमेदवार : अमर पाटील ( कणबस), राजू वाघमारे (बोरामणी), इंदूमती अलगोंडा पाटील.

माजी आमदार सिद्रामप्पा पाटालांनाही पराभवाचा दणका

कॉंग्रेसचे दिलीप माने आणि पालकमंत्री विजकुमार देशमुख यांच्या शेतकरी विकास पॅनलने अक्कलकोटचे माजी भाजप आमदार सिद्रामप्पा पाटील यांनाही पराभवाचा दणका दिला आहे. मुस्ती गटातून विकास पॅनलचे श्रीशैल नरोळे यांनी त्यांचा पराभव केला. याच गटातील देशमुख गटाचे सिध्दाराम हेले यांचाही धोबी पछाड झाला आहे.

पक्षीय बलाबल : 
 श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास महा आघाडी पँनल ( गट- माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे आदी) कडून निवडून आलेले शेतकरी जागेत 13 उमेदवारांचे नावे पुढील प्रमाणे.-  

1) कुंभारी गण- पालकमंत्री विजयकुमार देशमुख ( 2244 अधिक मताने विजयी)

2) हिरज गण- माजी आमदार दिलीप माने(1321 अधिक मताने विजयी)

3) कळमण गण- जितेंद्र साठे( 1564 अधिक मताने विजयी)

4) मंद्रुप गण- इंदुमती अलगोंडा पाटील( 773 अधिक मताने विजयी)

5) बाळे गण- विजया भोसले( 800 अधिक मताने विजयी)

6) औराद गण - बाळासाहेब शेळके(535 अधिक मताने विजयी)

7) नानज गण- प्रकाश चोरेकर( 440 अधिक मताने विजयी) 

8) पाकणी गण- प्रकाश वानकर(  719 अधिक मताने विजयी)

9) मुस्ती गण- श्रीशैल नरोळे( 782 अधिक मताने विजयी)

10) मार्डी गण- नामदेव गवळी( 484 अधिक मताने विजयी)

11) बोरामणी गण - राजकुमार वाघमारे( 391 मताने अधिक विजयी)

12) कणबस गण- अमर पाटील( 103 अधिक मताने विजयी)

13) भंडार कवठे गण- वसंत पाटील ( 402 अधिक मताने विजयी) असे ह्या महाआघाडी गटाकडून शेतकरी 15 जागा पैकी 13 जागेत निवडून आले आहेत.

श्री सिद्धरामेश्वर परिवर्तन पँनल ( सहकार मंत्री सुभाष देशमुख) कडून एकूण 2 उमेद्वार शेतकरी जागेसाठी निवडून आले आहेत. ते पुढील प्रमाणे

1) होटगी गण- रामप्पा चिवडशेट्टी ( 1282 अधिक मताने विजयी)

2) कंदलगाव गण- अप्पासाहेब पाटील- वडकबाळ कर( 188 अधिक मताने)  विजयी झाले आहेत.

अडत व व्यापारी यांच्या काढून 2  विजयी उमेद्वार - केदार उंबरजे यांना 700 तर बसवराज इटकळे यांना  657 मताने विजयी झाले आहेत.

हमाल व तोलर यांच्या कडून शिवानंद पुजारी हे 33 अधिक मताने विजयी झाले आहेत.

अशा एकूण 17 जाग्यांचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी जाहिर केलं आहे.