Sat, Mar 23, 2019 16:38होमपेज › Solapur › पहिल्या फळीतील नेते अडकले; दुसर्‍या फळीतील निवडणूक मैदानात !

पहिल्या फळीतील नेते अडकले; दुसर्‍या फळीतील निवडणूक मैदानात !

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:15PMसोलापूर ः प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. बाजार समितीतील अपहारप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने मुख्य नेतेमंडळी या निवडणुकीपासून अलिप्त झाली असली तरी दुसर्‍या फळीतील नेतेमंडळी आता निवडणूक रिंगणात उतरली आहे. 

गुरुवारी विविध गणांतून जवळपास 54 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये व्यापारी मतदारसंघातून शांतप्पा कुंभार, तर औराद गणातून शिवानंद पाटील, भंडारकवठे - यतीन शहा, श्रीशैल पाटील, कणबस - रामप्पा चिवडशेट्टी, मंद्रुप - विद्युलता कोरे, कळमण - जितेंद्र साठे, इंद्रजित पवार, वैशाली साठे, नान्नज - इंद्रजित पवार, मार्डी - लक्ष्मण भोसले, बोरामणी - अमृता बनसोडे, बाळे - विजया भोसले, हिरज - जयकुमार माने, धनंजय भोसले, भारत जाधव, होटगी - बाळासाहेब पाटील, रामप्पा चिवडशेट्टी कुंभारी - प्रकाश बिराजदार, जयकुमार माने, सिध्दाराम चाकोते, मुस्ती गणातून श्रीशैल नरोळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  121 लोकांनी गुरुवारी 173 अर्ज नेले होते. यामध्ये विश्‍वशंकर चाकोते, भीमाशंकर जमादार, मंगल वानकर, प्रकाश वानकर, राजशेखर शिवदारे, अमर पाटील, केदार उंबरजे, शिवशरण बिराजदार, इंदुमती अलगोंडा, श्रीशैल बनशेट्टी, नागेश वल्याळ, संदीप टेळे, सिध्दाराम देवकते, अशोक देवकते यांचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत 438 अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज विक्रीसाठी आणखी दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे आणखी काही अर्जांची विक्री होणार आहे.