Tue, May 21, 2019 22:24होमपेज › Solapur › वाजपेयींच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

वाजपेयींच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:44PM
पंढरपूर : प्रतिनिधी
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शोकाकूल वातावरणात चंद्रभागेत विसर्जन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते आणि अटलप्रेमींची उपस्थिती होती. ‘अटल बिहारी वाजपेयी अमर रहे’ च्या घोषणा देत चंद्रभागेत त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. 

वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी सोलापूर येथून दुपारी 3.45 वाजता पंढरपूर येथील हुतात्मा स्मारक येथे दर्शनाकरिता ठेवण्यात आल्या. येथे दर्शनाकरिता शहर व  तालुका भाजप कार्यकर्ते तसेच सांगोला, मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

 हुतात्मा स्मारक येथून 4.30 वाजता शिवाजी चौक, चौफळा, नामदेव पायरी ते चंद्रभागा वाळवंट येथे अस्थी कलश नेण्यात आला. ‘अटल बिहारी वाजपेयी अमर रहे’ च्या घोषणा देत शोकाकूल वातावरणात चंद्रभागा वाळवंट येथे विधीपूर्ण केल्यानंतर 5 वाजता फुलांनी सजविलेल्या होडीतून चंद्रभागा नदीच्या पाण्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते अस्थींचे विसजर्र्न करण्यात आले.

यावेळी आ. प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष संजय वाईकर, सी.पी. बागल,  शंकर वाघमारे, सौदागर मोळक, सांगोला तालूकाध्यक्ष चंद्रकांत देशमूख, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, पं.स.सदस्य दादासाहेब मोटे, नगरसेवक अनिल अभंगराव, लक्ष्मण शिरसट, नगरसेविका शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, विक्रम शिरसट, काशिनाथ थिटे, उमेश वाघोलीकर,   बाबा बडवे, दत्ता रजपूर, आरती बसवंती, उल्का लटके, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.