Sun, Jan 20, 2019 00:41होमपेज › Solapur › ‘उजनी’चे पाणी औज बंधार्‍यात  

‘उजनी’चे पाणी औज बंधार्‍यात  

Published On: Jun 09 2018 10:58PM | Last Updated: Jun 09 2018 9:14PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून नदीमार्गे सोडलेले पाणी 10 दिवसांनी म्हणजे शुक्रवारी औज बंधार्‍यात दाखल झाले. औजसह चिंचपूर बंधाराही पूर्ण क्षमतेने भरल्याने आता दोन महिन्यांसाठी शहराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

औज बंधारा 15 मेच्यादरम्यान कोरडा पडला होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे उजनीतून पाणी सोडण्याची मागणी सोलापूर महापालिकेतर्फे करण्यात आली होती. मात्र, नेहमीप्रमाणे पाणी सोडण्यास शासनाने विलंब केला. 29 मे रोजी उजनीतून पाणी सोडण्यात आले. नदीमार्गे सोडलेले हे पाणी 232 किलोमीटरचा प्रवास करीत दहा दिवसांनी म्हणजे शुक्रवार, 8 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता औज बंधार्‍यात पोहोचले. सायंकाळी साडेसात वाजता हा बंधारा ओव्हरफ्लो झाला. ओव्हरफ्लोमुळे खालचा चिंचपूर बंधाराही शनिवारी सकाळी पूर्णपणे भरला. 

विस्कळीत पाणीपुरवठा सुरुळीत होणार

दोन्ही बंधारे भरल्याने शहराच्या पाण्याचा प्रश्‍न दोन महिन्यांकरिता सुटला आहे. औजचे पाणी येईपर्यंत शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा झाल्याने शहरवासियांचे हाल झाले. अशातच वारंवार वीज जाण्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे मनपा सभेत ओरडही झाली होती.