Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Solapur › उजनी धरणाने शंभरी गाठली; ५ हजार क्युसेकचा विसर्ग

उजनी धरणाने शंभरी गाठली; ५ हजार क्युसेकचा विसर्ग

Published On: Aug 27 2018 3:05PM | Last Updated: Aug 27 2018 3:05PMनिमगांव केतकी : प्रतिनिधी

पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्‍ह्यासह मराठवाड्यालाही वरदान ठरलेल्या उजनी धरणाने शंभरी पार केली आहे. त्यामुळे धरणाच्या आठ मोऱ्यांतून पाच हजार क्युसेकने पाण्याचा  विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. उजनी धरण राज्यातील सर्वाधिक पाणीसाठा असलेले धरण असून ३८ वर्षांत ३० वेळा धरण १०० टक्‍के भरले आहे. 

सध्या उजनी धरणामध्ये ११७ टीएमसी पाणीसाठा असून ४२ मोर्‍यांपैकी आठ मोर्‍यांतून भीमा नदीत विसर्ग सोडण्यास सुरुवा केली आहे. तर पावसामुळे पुणे जिल्‍ह्यातील सर्व धरणे भरली असून उजनीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. दौंडमधून ३९ हजार ९८१ क्युसेकची आवक सुरू आहे. 

उजनीने शंभरी पार केल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखानदार व शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भीमा, नीरा खोर्‍यात पाऊस सुरुच असून नदी पात्रातील पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.