Sat, Jul 11, 2020 21:59होमपेज › Solapur › माढा परिसरात पाच अपघातांत २ ठार, ७ जखमी

माढा परिसरात पाच अपघातांत २ ठार, ७ जखमी

Published On: Dec 21 2017 1:50AM | Last Updated: Dec 20 2017 10:54PM

बुकमार्क करा

माढा : वार्ताहर

माढा व  परिसरात मंगळवारी झालेल्या पाच वेगवेगळ्या अपघातांत दोघे जण जागीच ठार झाले, तर सात जण जखमी झाले. माढा शहरातील इंदिरानगरमधील दोन युवकांच्या अकाली अपघाती मृत्यूने शोककळा पसरली होती.

माढ्यातील इंदिरानगर भागातील धीरज सनातन पांडगळे (वय 21) व बाळकृष्ण सुनील पवार (वय 20) हे दोन युवक कुर्डुवाडी  येथे मोबाईल खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथून माढ्याला दुचाकीवरून परत येत असताना त्यांच्या मोटारसायकलला (एमएच 45 एच 2848) अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मंगळवारी दुपारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मोटारसायकल (एमएच 45 के 1366) व ट्रक (एमएच 20 एए 7730) यांच्यात झालेल्या अपघातात पोलिस हवालदार उत्तम तुकाराम पालकर (रा. माढा)  व तानाजी पांडुरंग चव्हाण (रा. शेटफळ) हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माढा-वडशिंगे रस्त्यावर शशिकांत विठ्ठल कासार व आशा मधुकर आष्टेकर (दोघे रा. माढा) यांचा व सुखदेव वसुदेव शेळके व संगीता सुखदेव शेळके (रा. सुर्डी, ता. बार्शी) यांच्या मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन चौघेही जखमी झाले. 

त्यांच्यावर माढा ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले, तर इंद्रजित मधुकर कांबळे (रा. औज, ता.द. सोलापूर) यांचा माढेश्‍वरी मंदिराजवळ खडीवरून गाडी घसरून अपघात होऊन ते जखमी झाले.