Mon, May 27, 2019 07:58होमपेज › Solapur › शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदेंवर दोन गुन्हे दाखल

शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदेंवर दोन गुन्हे दाखल

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:44PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत मदत न केल्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण केल्याप्रकरणी तसेच पोलिस चौकीमध्येच पोलिस निरीक्षकास धक्‍काबुक्‍की करून   पळून  गेल्याप्रकरणी   शिवसेनेच्या नगरसेवकासह दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल  करण्यात  आले  आहेत. ही घटना बाळे येथील सोमवारी मध्यरात्रीच्या  सुमारास   सुयोग ऑर्केस्ट्रा बार आणि बाळे पोलिस चौकीमध्ये घडली.

पुरुषोत्तम दिगंबर  बन्‍ने (वय 40, रा. पत्रा   तालीम,  उत्तर कसबा) आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक शहाजी नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल बाळासाहेब शिंदे, सागर भैया (रा. मंगळवेढा तालीम, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे येथे सुयोग ऑर्केस्ट्रा बार असून मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पुरुषोत्तम बन्‍ने हा बारमधून त्याची मोटारसायकलवरून घरी जात होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचे नगरसेवक अमोल शिंदे, सागर भैय्या व एका अनोळखी व्यक्‍तीने बन्ने यास मागील महानगरपालिका निवडणुकीवरून तू आम्हाला निवडणुकीत मदत का केली नाही, तुला मस्ती आली आहे का असे म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत बन्‍नेच्या शर्टच्या खिशातील 1760 रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. 

यावेळी भांडणात बन्‍ने याच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटली. ती तिथेच मिळाली. ही घटना घडल्यानंतर जखमी बन्ने हा बाळे पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर तेथील कर्मचार्‍यांनी रात्रगस्तीवर असलेल्या दुय्यम पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी पोलिस निरीक्षक पवार हे बाळे पोलिस चौकीत आले व त्यांनी बन्ने याच्याकडे घडलेल्या घटनेबाबत चौकशी केली. तेथे अमोल शिंदे याने मी नगरसेवक आहे असे म्हणून पोलिस निरीक्षक पवार यांच्या अंगावर जाऊन त्यांची गच्ची पकडून भिंतीवर ढकलले. त्यामध्ये पोलिस निरीक्षक पवार यांच्या अंगठ्याला मार लागलेला असून यावेळी शिंदेने मी नगरसेवक आहे, पवार साहेब नीट नोकरी करा, अशी धमकी दिली. त्यावेळी पोलिस चौकीत गोंधळ करून शिंदे याने तेथून  बार्शीकडे कारमधून पळून गेला.  पोलिस निरीक्षक शहाजी पवार व सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.