Thu, Jul 18, 2019 21:01होमपेज › Solapur › ‘त्या’ सयामी जुळ्या बाळाचा मृत्यू

‘त्या’ सयामी जुळ्या बाळाचा मृत्यू

Published On: Apr 14 2018 9:24PM | Last Updated: Apr 14 2018 9:24PMसोलापूरः प्रतिनिधी

दोनच दिवसांपूर्वी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन तोंड, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका आणि धड मात्र एक अशा प्रकारचे सयामी जुळे बाळ जन्मले होते. मात्र उपचारावेळी ‘त्या’ सयामी जुळ्या बाळाचा मूत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुनिल घाटे यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 13 एप्रिल रोजी सोलापूरातील महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. दरम्यान जास्त प्रसूती कळा येत असल्याने त्यांची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी केली. त्यामध्ये पोटात दोन तोंडं असलेलं बाळ असल्याचे डॉक्टरांना आढळले. डॉक्टरांनी त्या मातेला आणि त्यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली. त्यामुळे त्यांची मानसिक तयारी झाली होती. त्यामध्ये त्या मातेने स्त्री जातीच्या सयामी जुळ्या बाळाला जन्म दिला.  त्या बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम होते. तर दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्रा बाळाला शरीर मात्र एकच अससल्याचे दिसून आले. जी लाखातील एक आणि सिव्हील हॉस्पिटलमधील पहिलीच घटना होती.

या सयामी जुळ्या बाळावर अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे रांच्रा मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिरनकर, बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. एस. व्ही. सावस्कर, बालरोग चिकित्सक डॉ. सुदर्शन चक्रे, बालरोग शल्रचिकित्सक डॉ. रवी कंदलगावकर उपचार करीत होते. पुढे या डॉक्टरांच्या टिमने त्या सयामी जुळ्या बाळाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आज, शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास त्या बाळाचा मृत्यू झाला.