Wed, Jul 17, 2019 12:55होमपेज › Solapur › जिल्ह्यात कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 29 हजार शेतकर्‍यांना लाभ 

जिल्ह्यात कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 29 हजार शेतकर्‍यांना लाभ 

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:31PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेची अनंत अडचणींमधून वाटचाल सुरू असून आजपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 29 हजार 691 शेतकर्‍यांना लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. येत्या दोन दिवसांत दुसरी ग्रीन लिस्ट जाहीर होणार असून यामध्ये थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्जमाफी योजनेतून 208 कोटी 77 लाख रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी 29 हजार 691 शेतकर्‍यांच्या खात्यावर जवळपास 152 कोटी 67 हजार 444 रुपये जमा करण्यात आले आहेत. 

त्यामुळे जिल्हा बँकेकडे यापैकी 56 कोटी 79 लाख 86 हजार 642 रुपये शिल्लक राहिले असल्याचे राजन पाटील यांनी यावेळी सांगितले.  जिल्हा बँकेकडे कर्जदार असणार्‍या 8 हजार 141 शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्या त्रुटी पूर्ण करण्याचे काम सुरु असून लवकरच या त्रुटी पूर्ण करण्यात येणार आहेत. 
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतून सोलापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 29 हजार शेतकर्‍यांना  प्रत्यक्ष लाभ झाला आहे. उर्वरित शेतकर्‍यांची आता पडताळणी सुरु आहे. ही पडताळणी पूर्ण होताच शासनाला माहिती पाठविण्यात आलेली आहे. 

येत्या दोन दिवसांत दुसरी ग्रीन लिस्ट प्रसिध्द होणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी यावेळी सांगितले. सुरुवातील शासनाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अडचणी असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेळ लागला असल्याची कबुली यावेळी पाटील यांनी दिली आहे.