Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Solapur › राज्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी

राज्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी

Published On: May 02 2018 10:49PM | Last Updated: May 02 2018 10:25PM सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य येत्या 4 मे रोजी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे येणार असून यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेण्यात येणार असून त्यासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याच्या लेखी पुराव्यानिशी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

4 मे रोजी सकाळी 11 ते 5 यावेळेत ही जनसुनावणी होणार आहे. यावेळी डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. राजाभाऊ करपे आदी उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून घेण्यासाठी विभागवार जनसुनावणी घेण्यात येणार आहे. यावेळी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याबाबतचे जास्तीत जास्त पुरावे आयोगासमोर सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे सुनावणी होणार आहे. याठिकाणी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन येणार्‍या नागरिकांना संगमेश्‍वर कॉलेज, सात रस्ता येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.