Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Solapur › गुप्तांगावर वार करून घेणार्‍या कैद्याचा मृत्यू

गुप्तांगावर वार करून घेणार्‍या कैद्याचा मृत्यू

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 10:35PMसोलापूर : प्रतिनिधी

खोटा गुन्हा दाखल झाला आहे, कारागृहात आपल्याला कोणीही भेटायला आले नाही म्हणून रावसाहेब उत्तम आवारे (रा. गुरुनानकनगर, उजनी वसाहत, सोलापूर) याने कारागृहाच्या शौचालयात जाऊन स्वत:च्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. यामध्ये तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही त्याने लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जखमी आवारे याचा उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

रावसाहेब आवारे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यास अटक करण्यात आली होती. सध्या तो जिल्हा कारागृहात होता. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिना झाला, कोणीही भेटण्यास आले नाही, जगून तर काय करायचे, मी मेलो तर माझ्या जागेवर माझी मुलगी  नोकरीला लागेल, या कारणावरून कर्मचार्‍यांची नजर चुकवून दाढी करण्याचे ब्लेड घेऊन तो शौचालयात गेला होता. शौचालयात गेल्यानंतर त्याने स्वत:च्या गुप्तांगावर ब्लेडने मारून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला जखमी अवस्थेमध्ये उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याबाबत सदर बझार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

solapur, Prisoner, death, issue,