Thu, Jun 27, 2019 02:22होमपेज › Solapur › शहरातून अवजड वाहतूक बंदीसाठी एक लाख स्वाक्षर्‍या

शहरातून अवजड वाहतूक बंदीसाठी एक लाख स्वाक्षर्‍या

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 9:51PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातून होणार्‍या जड वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. ती पूर्णपणे थांबवण्यासाठी जड वाहतूकमुक्त नागरी कृती समितीकडून श्रध्दांजली सभा, सह्यांची मोहीम आणि धरणे आंदोलन करण्यात आले. ज्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा, नागरिकांचा सहभाग होता.

सोलापूर शहरातून बोरामणी नाका ते विजापूरमार्गे होणारी जड वाहतूक बंद झाली पाहिजे. यासाठी नागरी कृती समितीच्यावतीने मंगळवारी, सकाळी  दहा वाजता श्रद्धांजली सभा व सह्यांच मोहीम अक्कलकोट रोड येथील शांती चौकात राबविली. या श्रद्धांजली सभेस शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, मनोहर सपाटे, नगरसेवक देवेंद्र कोठे, विष्णू कारमपुरी, अशोक इंदापुरे, सुरेश फलमारी, नगरसेविका कामिनी आडम, परिवहन सदस्य विजय पुकाळे, परशूराम भिसे, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे राजू राठी, यंत्रमागधारक संघाचे पेंटप्पा गड्डम, परिवहन माजी सभापती मल्लेश बडगू, माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, प्रा. मधुकर जाधव, माजी नगरसेवक रमेश व्हटकर, मल्लिकार्जुन कमटम, शशिकांत कैंची, गणेश पेंनगोंडा (मुंबई) आदींनी कृती समितीस पाठिंबा दिला आणि सहभाग नोंदवला. 

याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर शहरातून जड वाहतूक बंद झाली पाहिजे. बाह्यवळण दिले पाहिजे. यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा कृती समितीने करावा आणि कृती समितीस माझा सक्रिय पाठिंबा राहील. याप्रसंगी कृती समितीच्यावतीने संपूर्ण आठवडाभर विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालये, कारखाने, प्रमुख चौक, प्रमुख बाजारपेठा येथे सह्यांची मोहीम राबवण्यात येईल. एक लाख सह्यांचे समर्थन घेऊन जिल्ह्याधिकारी, पालकमंत्री, सहकारमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

आंदोलन यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश पडाल, निरंजन बोद्दूल, सत्यनारायण गुर्रम, नागेश सरगम, अंबादास कुडक्याल, भक्ती जाधव, भीमराव आसादे, वसंत गुत्तीकोंडा, मनोहर इगे, दयानंद कोंडाबत्तीन, अमृतदत्त चिन्नी, गौरीशंकर कोंडा, अशोक बल्ला, राजू कट्टा, अनिल वासम आदींनी परिश्रम घेतले.