Thu, Jan 24, 2019 14:47होमपेज › Solapur › बाजार समिती निवडणूक; आज अर्जांची छाननी

बाजार समिती निवडणूक; आज अर्जांची छाननी

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 10:45PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. कोणाचा अर्ज वैध आणि कोणाचा अवैध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये येणेबाकी दाखला आणि राखीव मतदारसंघातील उमेदवारांसाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनेक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत ही कागदपत्रे जोडली नाहीत. त्यामुळे छाननीवेळी हे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. तर माजी संचालकांपैकी काही लोकांवर बाजार समितीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत  निवडणूक प्राधिकरण काय निर्णय घेणार, हेही आज स्पष्ट होणार आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी जवळपास 393 अर्ज आले आहेत.त्यापैकी किती बाद होणार, हे आज स्पष्ट होणार आहे. एकंदरीतच आजचा दिवस बाजार समिती निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविणारा असणार आहे.