Fri, Feb 22, 2019 03:44होमपेज › Solapur › कठुआप्रकरणी एमआयएमचे आंदोलन

कठुआप्रकरणी एमआयएमचे आंदोलन

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 10:06PMसोलापूर : प्रतिनिधी 

राज्यात आणि देशात अल्पवयीन मुलींवर तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. दुसरीकडे कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे नुकतेच जम्मू-काश्मिर येथील कठुआ जिल्ह्यात झालेल्या अत्याचाराविरोधात एमआयएम पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले तसेच तोंडाला काळी पट्टी बांधून अत्याचार्‍याला तत्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

रासना या गावातील 8 वर्षीय बालिकेवर काही लोकांनी बलात्कार करुन तिला जीवे मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अशा प्रकाराला आता आळा घालण्यासाठी शासनाने कडक पावले उचलायला हवीत. या प्रकरणाला आता जातीय रंग देण्याचा प्रकार सुरू आहे. यामध्ये निधर्मीय पद्धतीने चौकशी व्हावी, अशी मागणी पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. 

यावेळी नगरसेवक तौफिक शेख, उपाध्यक्ष समिउल्लाह शेख, नसीम खलिफा, सोहेल शेख, अझहर हुंडेकरी, गाझी जहागीरदार, रियाज खैरादी, साजिया शेख, वाहेदा शेख, तस्लीम शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते