Sat, Nov 17, 2018 10:04होमपेज › Solapur › सोलापुरातील ‘कळी’ या लघुपटास नामांकन

सोलापुरातील ‘कळी’ या लघुपटास नामांकन

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 9:15PMसोलापूर : प्रतिनिधी

नाशिक येथील दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कारसाठी सोलापूर येथील लेखक,  निर्माते, दिग्दर्शक दत्तात्रय नागनाथ पांढरे यांच्या लोकमाता प्रोडक्शननिर्मित ‘कळी’ या लघुपटाला नामांकन झालेले आहे. हा लघुपट स्त्रीभ्रूण हत्यावर आधारित असून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न यात करण्यात आलेला आहे. कमी वेळेत व चांगला विषय निवडल्याबद्दल ‘कळी’ या लघुपटाचे नामांकन झालेले आहे. यात युसूफ बिराजदार, दीपक गडदे व लक्ष्मी थोरात, मोहिनी थोरात, सत्यवान पांढरे, रुक्मिणी नरुटे, बाल कलाकार म्हणून अमृता गोफणे व सुनाक्षी पांढरे या कलाकारांनी त्यांची कला अत्यंत उत्तमप्रकारे बजावली आहे. लाईटसमन म्हणून अमिर सोहेल इनामदार, परवेझ इनामदार, सुमित मिस्कीन यांनीदेखील कामगिरी केली आहे. यासाठी अर्जुन सलगर, डॉ. संगीता नलावडे, डॉ. माधव जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले व विद्यासागर अध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.