Sat, Feb 23, 2019 16:20होमपेज › Solapur › नैसर्गिक प्रसूतीवेळी अर्भकाचा मृत्यू; डॉक्टरवर गुन्हा दाखल

नैसर्गिक प्रसूतीवेळी अर्भकाचा मृत्यू; डॉक्टरवर गुन्हा दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

नैसर्गिक प्रसूती करताना अर्भकाचा मृत्यू झाल्याने संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे.सिझेरियन शस्त्रक्रियेची आवश्यकता असताना, रुग्णास  वेटिंगवर ठेवल्याने अर्भकाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद ऋषीकेश महेश भोसले (वय 26, रा. दक्षिण कसबा, सोलापूर) यांनी डॉ. वाणी जावळे यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

30 मे 2017 रोजी निकिता भोसले ही रुग्ण प्रसूतीकरिता व औषधोपचाराकरिता शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय ऊर्फ बागेवाडीकर रुग्णालय येथे दाखल झाली होती. रुग्ण निकीता भोसले हिच्या अर्भकाचे वजन 4 किलो 200 ग्रॅम होते. डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसुतीकरिता प्रयत्नासाठी रुग्णास एक दिवस वेटिंगवर ठेवले होते.

वजन जास्त असल्याने प्रसुतीकरिता आलेल्या रुग्णास सिझेरीयनची आवश्यकता होती. परंतु तसे न करता नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रयत्न केला होता. डॉक्टरांनी फोरसोप लावून डिलेव्हरी करण्याचा प्रयत्न केला होता. प्रसुतीनंतर नवजात अर्भकाच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या. प्रसुती दरम्यान डोक्यावर एकसंघ दाब पडल्याने अर्भक मृत अवस्थेत जन्मास आले.या कारणास्तव 31 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फौजदार चावडी पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोसई देशमाने करत आहेत.


  •