Thu, Apr 25, 2019 11:44होमपेज › Solapur › अधिकारात असेल तर अनुसूचित जातीची वर्गवारी करू

अधिकारात असेल तर अनुसूचित जातीची वर्गवारी करू

Published On: Dec 22 2017 1:30AM | Last Updated: Dec 21 2017 8:50PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

अनुसूचित जातीच्या विविध जातींमध्ये वर्गवारी करण्याचे अधिकार राज्यशासनाला असतील तर ती कार्यवाही निश्‍चित करु अन्यथा आरक्षणाचा लाभ सर्वांना होण्यासाठी आपल्या मागणीचा ठराव करुन केंद्र शासनाला पाठवू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली आहे.

अनुसूचित जातीमधील विविध 58 प्रकाराच्या जातींची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने नागपूर अधिवेशनाप्रसंगी दिले. यावेळी अनुसूचित जातीमधील काही जातींना आरक्षणाचा मोठा लाभ  झाला आहे. तर त्यापैकी अनेक जाती यापासून वर्षानुवर्षे वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे इतर जातीवर अन्याय होत असून यामध्ये अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करुन त्यांना आरक्षणाचा लाभ विभागून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री खंदारे, सुरेश पाटोळे, अनिल पाटोळे उपस्थित होते.