Sat, Nov 17, 2018 03:58होमपेज › Solapur › हुतात्मा स्मृती मंदिराची व्यवस्‍था सुधारा : भरत जाधव 

हुतात्मा स्मृती मंदिराची व्यवस्‍था सुधारा : भरत जाधव 

Published On: Jul 20 2018 5:27PM | Last Updated: Jul 20 2018 5:28PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील (नाट्यगृह) ना खुर्च्या व्यवस्थित आहेत ना रंगमंच व्यवस्थित आहे. ग्रीन रुम्स बद्दल तर न बोललेले बरे, त्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिराची एकूणच व्यवस्था अतिशय वाईट असून ती तातडीने सुधारावी अशी मागणी जेष्ट अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्य भरत जाधव यांनी आज महापालिका आयुक्तांकडे केली. 

एका नाटकाच्या प्रयोगासाठी भरत जाधव आज सोलापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी स्मृती मंदिराचा कोपरान कोपरा फिरुन पाहिला व तेथील अस्वच्छता मोडलेल्या खुर्च्या बंद पडलेले एसी आदी बाबींची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. 

यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर, स्थापत्य समिती सभापती  गुरुशांत धुत्तरगांवकर नाट्य व्यवस्थापक प्रशांत बडवे, गुरु वठारे, विजय साळुंखे आदी उपस्थित होते.