होमपेज › Solapur › कृषीखात्याकडून अवजारे खरेदीसाठी अनुदान

कृषीखात्याकडून अवजारे खरेदीसाठी अनुदान

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:37PMसोलापूर : प्रतिनिधी

उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्यावतीने सन 2018-19 या वर्षाकरिता शेतकर्‍यांना विविध प्रकारची कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी 25 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकर्‍यांनी 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

आठ बीएचपीपेक्षा कमी असलेल्या पॉवर टिलरच्या खरेदीसाठी मागासवर्गीय व अल्पभूधारक  शेतकर्‍यांना 50 हजार, तर अन्य शेतकर्‍यांना 40 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. 8 पेक्षा जास्त बीएचपी पॉवर टिलरच्या खरेदीसाठी मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 75 हजार व अन्य शेतकर्‍यांना 60 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. 

स्वंयचलित पॅडी ट्रान्सप्लाँटर 4 ओळीच्या मशीन खरेदीसाठी मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 94 हजारांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित शेतकर्‍यांसाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. 4 ते 16 ओळीच्या ट्रान्सप्लाँटर खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत असून उर्वरित शेतकर्‍यांनाही इतकेच अनुदान देण्यात येत आहे. रिपर कम बाईंडरच्या खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 1 लाख 25 हजार, तर अन्य शेतकर्‍यांना 1 लाखापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. रिपर, न्युमॅटिक इतर प्लाँटरच्या खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 63 हजारांचे, तर अन्य शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. कल्टिव्हेटर मशीनच्या खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 44 हजार रुपयांपर्यंत, तर अन्य लाभार्थ्यांना 35 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. रोटाव्हेटर, सब सॉईलर, रोटो कल्टिव्हेटर मशीन खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 63 हजार रुपयांपर्यंत, तर अन्य शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. खते, बी टोकण यंत्र प्लाँटर खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 63 हजार रुपयांपर्यंत, तर अन्य शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. पॉवर विडरच्या खरेदीसाठी 63 हजार रुपयांचे अनुदान मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. उर्वरित लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. सर्व प्रकारचे थ्रेअर व रिपर खरेदीसाठीही वरीलप्रमाणेच अनुदान देण्यात येत आहे. ट्रॅक्टर माऊंटेट, ऑपरेटेड स्प्रेअरसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 63 हजार व अन्य शेतकर्‍यांना 50 हजारांचे अनुदान देण्यात येत आहे.

मिनी राईस मिल मशीन खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना दीड लाखापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित शेतकर्‍यांना 1 लाख 25 हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. राईल मिल व  दाल मिलच्या सर्व मिनी प्रकारचे पॉलिशर, क्लिनर, ग्रेडर खरेदीसाठी मागासर्गीय व अल्पभूधारक शेतकर्‍यांना 44 हजार, तर उर्वरित शेतकर्‍यांना 35 हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नुमन्यात अर्ज शेतकर्‍यांनी कृषी सहायक, कृषी मंडल अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे.