Mon, May 27, 2019 06:49होमपेज › Solapur › इंधन दरवाढीचा भडका; विरोधी पक्ष आक्रमक 

इंधन दरवाढीचा भडका; विरोधी पक्ष आक्रमक 

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 9:36PMसोलापूर : प्रतिनिधी 
भाजप शासनाच्या काळात पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या किंमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात मंगळवारी शिवसेनेच्यावतीने डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली.

शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाबरोबर शिवसेनाही सत्तेत असली तरी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी शिवसेना सातत्याने आवाज उठवित आहे. त्यामुळे ‘आवाज कोणाचा, शिवसेनेचा’, चलेजाव चलेजाव, भाजप सरकार चलेजाव’ अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, सुनील शेळके, विजय पुकाळे, विष्णू कारमपुरी आदी उपस्थित होते. घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना शासनाने यावर नियंत्रण आणणे अपेक्षित असताना पेट्रोल आणि घरगुती गॅस दरवाढीचे नियंत्रण करण्यात शासन अपयशी ठरत आहे. 

त्यामुळे शासनाने झालेली ही दरवाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा शिवसेनेच्यावतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला आहे.

सोलापूर : प्रतिनिधी 

भाजप शासनाच्या काळात पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या किंमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात मंगळवारी शहर राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘महागडे सरकार चलेजाव, चलेजाव’च्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले असून शासनाने इंधनामध्ये सातत्याने दरवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ पोहोचत असताना सरकार याचा कोठेच विचार करत नाही. त्यामुळे ‘नही चलेगी, नही चलेगी सरकार की ये तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या तसेच शासनाने केलेली दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने शहराध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार, निर्मला बावीकर यांनी केली. या आंदोलनात मनिषा नलावडे, लता फुटाणे, सुनीता रोटे, मनोहर सपाटे, किरण पवार, जुबेर बागवान, बिसमिल्ला शिकलगार, इब्राहिम खैरदी यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला.