Mon, Jul 22, 2019 02:51होमपेज › Solapur › शेतकरी कर्जमाफीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

शेतकरी कर्जमाफीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 10:13PMसोलापूर : प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफीला राज्य सरकारने मुदतवाढ दिली असून 30 सप्टेंबरपर्यंत शेतकर्‍यांना कर्जाचे नूतनीकरण करता येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरीवर्ग कर्ज असलेल्या बँकांत जाऊन आपले दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून घेऊ  शकतील.

राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज     शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना  कर्जमाफी देण्यात येत आहे. त्याची मुदत 30 जूनपर्यंत होती. कर्जमाफी  दिलेल्या मुदतीनुसार 30 जूनपर्यंत शेतकरीवर्गाला कर्जमाफीचा फायदा घेता येणार होता. परंतु आता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून 30 सप्टेंबरपर्यंत शेतकर्‍यांना  याचा लाभ मिळणार आहे.

दीड  लाखांपर्यंत  कर्ज असलेल्या शेतकरी  आपल्या जवळच्या शाखेत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकतील.बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर प्रदीप कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बँक ऑफ इंडियाच्या झोनमधील सात जिल्ह्यांतील खातेदारांना याचा लाभ मिळाला आहे. एकूण 172.12 कोटींचे कर्ज माफ करण्यात  आले आहेत.सद्यस्थितीपर्यंत राज्यातील सर्व राष्ट्रीय बँकांना व डीसीसी बँकेला राज्य सरकारकडून नऊ ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या आहेत. त्या ग्रीन लिस्टमध्ये ज्या शेतकर्‍याचे नाव असेल त्याला कर्जमाफी देण्यात येत आहे.

बँक ऑफ इंडियाच्या सात जिल्ह्यांमधील पीक कर्जमाफीचा अहवाल 

बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर झोनमध्ये येणार्‍या सात जिल्ह्यांतील शेतकरी  कर्जमाफीचा अहवाल देण्यात आला आहे. 24 हजार 418 खातेदारांची 172.12 कोटींची कर्जमाफी झाली आहे. सोलापूर - 85.24 कोटी पीक कर्ज माफ (12486 खाते), उस्मानाबाद  14.69 कोटी  पीक कर्ज माफ (1843 खाते), लातूर 7.13 कोटी पीक कर्ज माफ (904 खाते), नांदेड 38.36 कोटी पीक कर्ज माफ (4967 खाते), बीड  7.47 कोटी पीक कर्ज माफ (1354 खाते), परभणी 3.05 कोटी पीक कर्ज माफ (449 खाते), हिंगोली 16.18 कोटी कर्ज माफ (खाते 2415).