Sat, Nov 17, 2018 19:13होमपेज › Solapur › दीनदुबळ्यांसोबत साजरी व्हावी ‘ईद-ऊल-फित्र’

दीनदुबळ्यांसोबत साजरी व्हावी ‘ईद-ऊल-फित्र’

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 8:30PMसोलापूर : इरफान शेख

 फक्‍त नवीन कपडे परिधान करुन आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करणे म्हणजे ईद नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गोर-गरीब व दीनदुबळ्या व्यक्तींची मदत करून त्यांच्यासोबत ईद साजरी करणे म्हणजे ईद-उल-फित्र असल्याची माहिती मुफ्ती मोहम्मद मोहसीन कासमी यांनी दिली.

ईद त्याची नव्हे ज्याने नवीन कपडे परिधान केले आहे. ईद त्याची नव्हे ज्याने खूप मोठी खरेदी केली आहे. ईद त्याची आहे ज्याने महिनाभर रोजे ठेवले आहे. ईद त्याची आहे ज्याने महिनाभर देवाची प्रार्थना केली आहे. ईद त्या व्यक्तीची आहे ज्याने गोरगरीबांना व आपल्या परिसरातील गरजू, विधवा, अनाथांना मदत केली आहे. ईद त्याची आहे ज्याने महिनाभर रोजे ठेवून देवाला आपल्या प्रत्येक वाईट कृत्याची माफी मागितली आहे. अनेक जण कामाचे बहाणे करत रोजा ठेवण्यास मागे-पुढे केले, ज्या व्यक्तींनी  रमजानच्या पवित्र महिन्यात वाईट कृत्ये केली त्यांच्यासाठी ईद नव्हे. समाजामध्ये अनेक घटक असे आहेत की, ज्यांची ईद साजरी करण्याची ऐपत नसते. अशा खर्‍या गरजूंची मदत करावी असे अनेकवेळा प्रत्येक धर्मात सांगितले जाते. आजचे अनेक युवक ईदच्या दिवशी दुचाकी वाहने घेऊन सुसाट वेगाने हाकतात. हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे आणि समाजात याला मान्यताच नाही.शासनानेदेखील अशा कृत्यांवर बंदी आणली आहे. तसेच ईदला फटाके उडविणे किंवा जोरजोरात गाणी लावून ऐकणे याला कदापि मान्यता नाही.