Tue, Mar 19, 2019 05:38होमपेज › Solapur › एफआरपीसाठी कारखान्यांना १५ सप्टेंबरची डेडलाईन 

एफआरपीसाठी कारखान्यांना १५ सप्टेंबरची डेडलाईन 

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:39PMसोलापूर : प्रतिनिधी 

सन 2017-18 या गळीत हंगामात सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 12 साखर कारखान्यांकडे एफआरपीपोटीचे 132 कोटी रुपये थकले असून, हे पैसे देण्यासाठी कारखानदारांना पुन्हा 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कारखानदारांना आणखी काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकारण ऊसशेती आणि साखर कारखानदारी यांच्या भोवतीच फिरते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे ऊसशेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे एफआरपीची रक्कम तात्काळ मिळावी, अशी मागणी वारंवार शेतकर्‍यांमधून होत होती. मात्र अनेक कारखानदारांनी एफआरपीची रक्कम थकविल्याने त्यांच्यावर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सहकार व पणन विभागाने दिले होते.यामध्ये सेालापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आदेशही दिले होते. मात्र त्याला सहकार खात्याने स्थगिती दिली होती आणि काररखानदारांना  पहिल्यांदा 5 सप्टेंबरपर्यंत सर्वच साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांचे पैसे द्यावेत, असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता कारखानदारांना पुन्हा 15 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांची रकमा तत्काळ देऊन टाकाव्यात अन्यथा कारवाईला सामोरे जाव असा इशारा शासनाने दिला आहे.