Wed, Nov 21, 2018 03:37होमपेज › Solapur › सोलापूर डीसीसी बँकेच्या ‘त्या’ ५१ बदल्यांचे ‘गौडबंगाल’  

सोलापूर डीसीसी बँकेच्या ‘त्या’ ५१ बदल्यांचे ‘गौडबंगाल’  

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:22PMसोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्‍त करण्याच्या दोन दिवसाअगोदर तब्बल 51 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांमागचे कारण काय ते अद्याप काही केल्या समजू शकले नाही. यात निश्‍चित गौडबंगाल असल्याची चर्चा आहे. कारण प्रशासक नियुक्‍तीपूर्वी दोन दिवस अगोदर बदल्या झाल्याने संदिग्धता आहे.

बँकेच्या संचालक मंडळांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून तत्कालीन चेअरमन राजन पाटील यांनी प्रशासकीय सुलभतेसाठी 51 कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या. बदल्या झालेल्यांनी सध्याचे ठिकाण सोडून नवनियुक्‍त ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कार्यमुक्‍त केल्याचा अहवाल घेऊन नवीन नियुक्‍तीच्या ठिकाणी त्वरित रूजू व्हावे, तसा अहवाल त्यांच्या वरिष्ठांमार्फत प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. 

या बदल्यांच्या आदेशावर 28 मे रोजी स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर लगेच 30 मे रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन त्यावर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पदभार घेतला. आता प्रशासक या झालेल्या बदल्यांबाबत काय निर्णय घेतील, याबाबतही चर्चा सुरू आहे. 
झालेल्या बदल्यांमध्ये शाखा अधिकारी, बँक निरीक्षक, ऑडिट विभाग, लिपिक व शिपाई ही पदे आहेत.