Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Solapur › बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेस १.२८कोटीला गंडविले

बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेस १.२८कोटीला गंडविले

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 9:54PMसोलापूर : प्रतिनिधी

बनावट कागदपत्रे तयार करून महिलेची 1 कोटी 28 लाख 25 हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदर्शन बाबुराव साका, अरविंद सुदर्शन साका (रा. रविवार पेठ, सोलापूर), निशांत बुलबुले (रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रज्ञा जगदीश जाजू (रा. महेशनगर, सोलापूर) या महिलेने  फिर्याद  दाखल  केली आहे. 

प्रज्ञा जाजू यांचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिवस्मारक) येथे तळमजल्यात गाळा नं. 3 असून याठिकाणी निवास मशीनरीज नावाचे दुकान आहे. सुदर्शन साका, अरविंद साका   आणि  निशांत  बुलबुले या तिघांनी  मिळून सन 2016 मध्ये संगनमत करुन, कट करुन बनावट कागदपत्रे  तयार  केली व प्रज्ञा जाजू यांच्या   निवास  मशिनर ीज  या   दुकानाचा ताबा  घेतला. या दुकानातील 70 ते 75 लाख  रुपयांच्या साहित्यांची परस्पर विक्री केली तसेच भागवत टॉकिज शॉपिंग कॉम्प्लेक्समधील भाडोत्री घेतलेल्या न्यू अ‍ॅडव्हान्स  न्युमटिक  या  गाळ्यात व  गोडावूनमध्ये, मेकॅनिकी चौकातील रेनबो टॉवर्स येथील गोडावूनमध्ये, एस.टी. स्टँडसमोरील आंध्र  लॉज याठिकाणी जाजू यांनी शिफ्ट करुन ठेवलेले  साहित्य  आणि विक्री  केलेल्या  साहित्यापोटी येणे असलेली 25 लाख रुपयांची रक्‍कम अशी एकूण 1 कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच प्रज्ञा जाजू   यांचे   वडील  मरण पावलेले आहेत हे  माहिती असूनसुध्दा प्रज्ञा यांच्या  वडिलांच्या  नावे  बँकेत असलेली खाती बंद केली नाहीत. 
उलट प्रज्ञा  यांच्या  वडिलांच्या बँक खात्यातील  रक्‍कमही त्यांच्या वडिलांनी विश्‍वासाने सही करुन दिलेल्या चेक्सचा गैरवापर करुन त्याद्वारे 22 लाख रुपये काढले. युको बँकेत निवास मशिनरीज स्टोअर्स या नावे खाते उघडून जाजू यांच्या दुकानातील साहित्य घेऊन गेलेल्या पार्टीकडून आलेल्या चेक्सवर निवास मशिनरीज स्टोअर्स असे लिहून त्याद्वारे 6 लाख 25 हजार रुपये निवास मशिनरीजच्या खात्यावर वळते केले. पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.