Sat, Jul 20, 2019 08:40होमपेज › Solapur › औषधोपचाराच्या नावावर ६ लाखांची फसवणूक

औषधोपचाराच्या नावावर ६ लाखांची फसवणूक

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:34PMसोलापूर : प्रतिनिधी

औषधोपचार करण्याच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास करून सुमारे 6 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे दाखल झाली आहे.गुरूकृपा डुमणेनगर, बार्शी रोड, बाळे येथील रहिवासी सुनीता रमेश कंदारे यांच्या मुलीस मूलबाळ होण्याकरिता ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो. तिच्यावर औषधोपचार करतो म्हणून सोमनाथ रामचंद्र जोडबोटे व त्यांची पत्नी विनिता जोडबोटे यांनी वेळोवेळी दागिने काढून घेतले. मात्र मुलीवर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार केले नाहीत. 

अशाप्रकारे जवळपास 6 लाख रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सुनीता रमेश कंदारे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दाखल केली आहे. घटनेचा तपास पोसई देशमाने करत आहेत.ब्लड बँकेची 2 लाखांची फसवणूक ब्लड बँकेतील रक्कम वेळोवेळी बँकेत न भरता ती परस्पर वापरून जवळपास 2 लाख 10 हजार रूपयांच्या रकमेची फसवूणक केल्याची तक्रार विजापूर नाका पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन येथील एका ब्लड बँकेतील ब्लड वेळोवेळी विविध हॉस्पिटलमध्ये पुरवले आणि त्याची रक्कम बँकेत न भरता ती नरेश शाम मिनेकर (वय 32, रा. दमाणीनगर, सह्याद्री अपार्टमेंट, मरिआई चौक) याने वापरली आहे. 

सध्या तो पसार झाल्याची तक्रार राजेंद्र गोपाळ पाटील (वय 32,  रा. यशवंतनगर) यांनी सदर बझार पोलिस ठाणे येथे दिली आहे. या घटनेचा पुढील तपास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कांबळे हे करत आहेत.