Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Solapur › जिल्ह्यात ४ हजार ८०८ शाळा,३० हजार ६८९ शिक्षक

जिल्ह्यात ४ हजार ८०८ शाळा,३० हजार ६८९ शिक्षक

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 9:21PMसोलापूर  संतोष आचलारे

बारावीपर्यंत शिक्षण देण्यासाठी जिल्ह्याभरात विविध माध्यमांतील 4 हजार 808 शाळा कार्यरत असून, या शाळांत 30 हजार 689 शिक्षकांकडून ज्ञानदानाचे काम होत आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या सर्व शाळांत एकूण 29 हजार 624 शाळा वर्ग उपलब्ध आहेत. दहापेक्षा कमी पटसंख्या असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या 18 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 

केंद्र व राज्य शासनाकडून सर्व शिक्षा अभियान व बालकांचा मोफत व सक्‍तीचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने प्रत्येक मुलास शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. स्वयंअर्थचलित शाळांची संख्या वाढत असली, तरी विद्यार्थीसंख्याच कमी असल्याने या शाळाही बंद पडत असल्याचे दिसून येत आहे. 

शहरी भागात 885 शाळा असून, या शाळांतील पहिली ते आठवीपर्यंत  एकूण 2 लाख 13 हजार 413 विद्यार्थी आहेत. यात 1 लाख 13 हजार 404 मुलं, तर 1 लाख 9 मुली शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 4 हजार 805 पुरुष शिक्षक, तर 4 हजार 535 महिला शिक्षक कार्यरत आहेत. शहरी भागातील शाळेत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एकूण 8 हजार 898 शाळा खोल्या उपलब्ध असल्याची नोंद शिक्षण खात्याकडे आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या शाळेत 56 हजार 978 मुलं, तर 46 हजार 844 मुली शिक्षण घेत आहेत. 

ग्रामीण भागात 3 हजार 923 शाळा आहेत. यात पहिली ते आठवीपर्यंत एकूण 4 लाख 2 हजार 679 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात 2 लाख 14 हजार 641 मुलं, तर 1 लाख 88 हजार 38 मुलींचा समावेश आहे. नववी ते बारावीपर्यंत ग्रामीण भागातील शाळेत 87 हजार 180 मुलं, तर 66 हजार 391 मुली शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शिकविण्यासाठी एकूण 21 हजार 349 शिक्षक कार्यरत असून यात 15 हजार 642 पुरुष, तर 5 हजार 707 महिला शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी 20 हजार 726 शाळा खोल्या उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक 2 हजार 805 शाळा कार्यरत आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या उनदानावर चालणार्‍या 992, महापालिकेच्या 64, समाजकल्याणच्या 121 व स्वयंअर्थचलित 467 शाळा कार्यरत असल्याची माहिती शिक्षण जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली.