Sat, Jul 04, 2020 08:21होमपेज › Solapur › सरपंचपदांसाठी २३, तर सदस्यांसाठी ७७ उमेदवारी अर्ज दाखल

सरपंचपदांसाठी २३, तर सदस्यांसाठी ७७ उमेदवारी अर्ज दाखल

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:52PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी सरपंचपदांसाठी 23 उमेदवारी अर्ज, तर ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी 77  अर्ज दाखल झाले. दोन दिवसांत सरपंचपदासाठी 87 उमेदवारांनी 88, तर सदस्यपदांसाठी 87 उमेदवारांनी 88 उमेदवारी अर्ज दाखल केले.

अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी सरपंचपदांसाठी 22 उमेदवारांनी 23 अर्ज, तर सदस्यपदांसाठी 76 उमेदवारांनी 77  अर्ज दाखल केले. यामध्ये  सरपंचपदांसाठी पंढरपूर तालुक्यातून 3, करमाळा तालुक्यातून 9, सांगोला तालुक्यातून 2, माळशिरस तालुक्यातून 2, माढा तालुक्यातून 6  व मंगळवेढा तालुक्यातून 1 अर्ज असे 23 अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्यपदांसाठीही दुसर्‍या दिवशी 77 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये पंढरपूर तालुक्यातून 5, करमाळा तालुक्यातून 40, माढा तालुक्यातून 29  व मंगळवेढा तालुक्यातून 2 अर्ज असे एकूण 77 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, दि. 11 डिसेंबरपर्यंत असून अर्जांची छाननी दि. 12 रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 14 असून त्याच दिवशी  दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे, तर दि.26 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे व 27 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.