Mon, Nov 12, 2018 23:25होमपेज › Solapur › वर्गणी म्हणून ११ हजारांची खंडणी मागणार्‍यावर गुन्हा

वर्गणी म्हणून ११ हजारांची खंडणी मागणार्‍यावर गुन्हा

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 9:38PMसोलापूर : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी दुकानदाराला मारहाण करून वर्गणी म्हणून 11 हजार रुपयांची खंडणी मागणार्‍याविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश प्रकाश मेश्राम (रा. बाळे, सोलापूर) असे  गुन्हा  दाखल    झालेल्याचे नाव आहे. याबाबत नागराज सिध्देश्‍वर यादवाड (वय 48, रा. पाटील वस्ती, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 
बाळे येथे खंडोबा मंदिराशेजारी असलेल्या व्यापार्‍यांची व्यापारी असोसिएशन असून याचे सचिव प्रभाकर भालेकर आहेत. व्यापारी असोसिएशनने कोणत्याही नवीन मंडळाला वर्गणी द्यायची नाही, असा ठराव केलेला आहे. तरीही असोसिएशनचे  सचिव भालेकर व महेश मेश्राम याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी 11 हजार रुपये वर्गणी द्यावी म्हणून नागराज यादवाड यांना शिवीगाळ करून दुकानात घुसून मारहाण करून 11 हजार रुपये वर्गणी वसूल करतो म्हणून दमदाटी केली म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.