Tue, Mar 19, 2019 03:54होमपेज › Solapur › महाराष्ट्रासह विविध राज्यांत १० गुन्हे दाखल

महाराष्ट्रासह विविध राज्यांत १० गुन्हे दाखल

Published On: May 09 2018 10:21PM | Last Updated: May 09 2018 9:14PMसोलापूर : अमोल व्यवहारे

गेल्या     काही   दिवसांपूर्वी    उघडकीस आलेल्या क्यू नेट अपहारप्रकरणी  आर्थिक  गुन्हे  शाखा पोलिसांच्या तपासामध्ये फसवणूक झालेल्या तक्रारदारांची संख्या ही 60 वर गेली असून  फसवणुकीची रक्कमदेखील 2 कोटी 14 लाखांवर पोहोचली आहे.

या कंपनीकडून फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या ही सुमारे 350 असून  पोलिसांनी तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या कंपनीविरुद्ध कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतही अनेक गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत 10 गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सन 2013 मध्ये अंमलबजावणी संचालनालयनेदेखील (ईडी) कंपनीविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. 

बनावट कंपनीची स्थापना

क्यू आय ग्रुप ऑफ कंपनी मलेशिया  येथील असून या कंपनीमध्ये गोल्डक्वेस्ट   इंटरनॅशनल  प्रा. लि. आणि क्वेस्टनेट एंटरप्रायजेस प्रा. लि. या  कंपनी  असून   या कंपनीने भारतामध्ये मल्टिलेवल मार्केटिंग स्किम व पिरॅमिड सभासद  स्किम चालविली. या कंपनीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर या कंपनीतील सभासदांनी क्यू नेट लि. हाँगकाँग ही कंपनी तयार करुन ुुु.पिंशींळपवळर.ळप अशी वेबसाईट  तयार  केली. ही वेबसाईट विहान डायरेक्ट सेलिंग (इंडिया) प्रा. लि. बंगळुरु, कर्नाटक ही कंपनी चालवित आहे. यामध्ये मल्टिलेवल मार्केटिंग स्किम चालविली जात असून ई-कॉमर्सच्या नावाखाली स्वस्त किंमतीचे प्रॉडक्टस् विकत   घेऊन  या  कंपनीच्या वेबसाईटद्वारे बायोडिस्क, वॉचेस, चि-पेंडंट, गोल्ड कॉईन, अर्बल प्रॉडक्टस्, ई-एज्युकेशन पॅकेजेस, ट्रॅव्हल पॅकेजेस इत्यादी 30 हजार ते 7 लाख रुपयांपर्यंत असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना देऊन त्यांची फसवणूक केली. गुंतवणुकदारांना 5 वर्षांमध्ये 5 कोटी रुपयांपर्यंत फायदा होईल, असे आमिष दाखविलेले होते. 

सन 2000  ते  सन  2003  दरम्यान मे. गोल्डक्वेस्ट इंटरनॅशनल प्रा. लि. चेन्नई या नावाने, सन 2004 पासून मे. ट्रान्सव्ह्यू एंटरप्रायजेस इंडिया प्रा. लि., मे. विहान डायरेक्ट सेलिंग इंडिया प्रा. लि. बंगळुरु आणि मे. वनमाला हॉटेल्स, ट्रॅव्हल अँड सर्व्हिसेस प्रा. लि. या नावाने कंपन्या भारतात स्थापन केलेल्या आहेत. क्यू नेट लि. हाँगकाँग या कंपनीने मे. ट्रान्सव्ह्यू एंटरप्रायजेस इंडिया प्रा. लि., मे. विहान डायरेक्ट सेलिंग इंडिया प्रा. लि. बंगळूरु या कंपन्यांना फ्रँचायची कंपन्या बनवून क्यू नेट  या नावाने इंटरनेटर कॉम्पेनसेशन प्लॅन या नावाखाली  बायनरी  सिस्टिम व पिरॅमिड सिस्टिमप्रमणे प्रॉडक्टबेस मल्टिलेवल मार्केटिंग स्किम चालवून वेगवेगळ्या  कंपन्या स्थापन करुन लाखोजणांना करोडो  रुपयांना फसविल्याचे  उघडकीस आल्याने देशातील विविध  राज्यांतील पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.