Thu, Jul 18, 2019 06:36होमपेज › Solapur › श्रावण सोमवार : सोलापुरातील सिध्देश्वर मंदिर उजळले (व्हिडिओ)

श्रावण सोमवार : सोलापुरातील सिध्देश्वर मंदिर उजळले (व्हिडिओ)

Published On: Aug 13 2018 2:23PM | Last Updated: Aug 13 2018 2:52PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर ग्रामदैवत सिध्दरामेश्वराचे मंदिर श्रावण सोमवाराच्यानिमित्त विद्युत रोषनाईने उजळले आहे, तर योग समाधी विविधरंगी फुलांच्या सुंगंधात न्हाऊन निघाली आहे. 
दरवर्षी श्रावणातील प्रत्येक सोमवारी सिध्देश्वर मंदिरातील योग समाधीला फुलांची आरास केली जाते. यंदा कस्तुरबाई  आणि गणपती म्हाळप्पा घेरडीकर या दांपत्याच्यावतीने ही सेवा अर्पण करण्यात आली आहे.

फुलांच्या मेघडांबरीसाठी तब्बल ७५० किलो फुले लागली असून त्यामध्ये पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, भगवा झेंडू, पिवळा झेंडू, लाल अष्टर, कामिनी पत्ता अशी फुलं वापरण्यात आली आहेत. यातील पांढरी व पिवळी शेवंती फुले खास बेंगळूरहून मागविण्यात आली आहेत. तर या सजावटीचे काम भारत तेलसंग यांनी केले आहे.

श्रावण सोमवाराच्यानिमित्त सिध्देश्वर मंदिरातील पूल दुतर्फा प्रासादिक साहित्य भांडाराने फुलून गेली आहे. बाहेरील कमानीवर लावण्यात आलेल्या लाईटच्या माळा आणि त्याचे तळ्यातील पाण्यात उमटणारे प्रतिबिंब यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे.

हिंदू मुस्लीम एक्याचे दर्शन 
फुलांची मेघडांबरी आणि सजावट करण्यासाठी गेल्या अनेक वर्षाची परंपरा असून ही फुलांची गुंफन मुस्लीम समाजातील बांधव मोठ्या भक्तीभावाने करतात. तर तयार झालेल्या फुलांच्या माळा योगसमाधीवर लावण्याचे काम हिंदू बांधव करतात. सुमारे दोन दिवस हिंदू मुस्लीम बांधव अहो रात्र मेहनत करतात त्यामुळेच या सजावटीतील फुलातून  सामाजिक एक्याचाही सुगंध दरवळतो.