Tue, Feb 19, 2019 12:21होमपेज › Solapur › सिद्धेश्वर यात्रा कमिटी कार्यालयाचे उद् घाटन

सिद्धेश्वर यात्रा कमिटी कार्यालयाचे उद् घाटन

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 15 2017 9:56PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

विधीवत पूजा करत पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी व सिद्धेश्‍वर यात्रा जागा वाटप समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोगडे यांच्या हस्ते ग्रामदैवत सिद्धेश्‍वर गड्डा यात्रा कार्यालयाचे पंचकट्ट्यावर उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सिद्धेेश्‍वर गड्डा यात्रा होणार असल्याची माहिती सिद्धेश्‍वर गड्डा महायात्रा समिती व  सिद्धेश्‍वर मंदिर पंचकमिटीच्यावतीने सांगण्यात आली. शुक्रवारी सकाळी सिद्धेश्‍वर पेठेतील पंचकट्ट्याजवळ सिद्धेश्‍वर गड्डा महायात्रा कार्यालयाची विधीवत पूजा करत उद्घाटन करण्यात आले.

पुरोहित बसवराज शास्त्री हिरेमठ, शिवयोगी शास्त्री हिरेमठ व चिदानंद हिरेमठ यांनी पूजा करत  विधी पार पाडला. यावेळी मिरवणूक समिती अध्यक्ष मल्लिनाथ जोडभावी, दारुकाम समिती अध्यक्ष आप्पासाहेब गळके, सिद्धेश्‍वर प्रसाद समिती अध्यक्ष सिद्धेश्‍वर बमणी, रंगरंगोटी समितीप्रमुख गिरीश गोरनाळी, प्रसिद्धीप्रमुख अ‍ॅड. एस.आर.पाटील, जनावर बाजार समितीप्रमुख काशीनाथ दर्गोपाटील, पंचकमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे, गौरीशंकर डुमणे, बसवराज अष्टगी, गुंडप्पा कारभारी, सोमशंकर देशमुख, विश्‍वनाथ लब्बा, भीमाशंकर पटणे, शिवकुमार पाटील आदी उपस्थित होते.