Sat, Mar 23, 2019 18:15होमपेज › Solapur › काव्यप्रेमी शिक्षक मंच म्हणजे कवीच्या हक्‍काचे व्यासपीठ : श्रीपाल सबनीस

काव्यप्रेमी शिक्षक मंच म्हणजे कवीच्या हक्‍काचे व्यासपीठ : श्रीपाल सबनीस

Published On: Jun 06 2018 10:27PM | Last Updated: Jun 06 2018 8:42PMसोलापूर : प्रतिनिधी

काव्यप्रेमी शिक्षक मंच नवोदित व प्रस्थापित कवी व साहित्यिकांसाठी हककाचे नवीन व्यासपीठ असून दोन वर्षांपूर्वी व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिक्षक कवींनी स्थापलेल्या या संस्थेने एक यशस्वी साहित्य चळवळ उभारली आहे. या कवींच्या धडपडीबद्दल बोलावे तेवढे कमीच असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर या राज्यस्तरीय संस्थेतर्फे लातूर येथील दयानंद सभागृहात काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काव्य महोत्सवात ‘आसमंत काव्यप्रेमींचे’ या 238 विक्रमी कवींच्या कवितांच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशनही डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील ‘भिजव सारा गाव’ या काव्यसंग्रहाचे कवि योगिराज माने होते. याशिवाय नयन राजमाने, रमेश दापके, आर. के. इप्पर, अशोक सावरगावकर, विठ्ठलराव भराटे, आत्माराम कांबळे, रामदास वाघमारे, प्रा. सत्येंद्र राऊत, आनंद घोडके, कालिदास चवडेकर, कृष्णा शिंदे, दीपक सपकाळ, जया नेरे, प्रमोद बाविस्कर, रामदास देशमुख, दयानंद बिराजदार मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

काव्यमहोत्सव यशस्वी होण्यासाठी लातूर काव्यप्रेमी शिक्षक मंचचे पदाधिकारी व अंबाई बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केले.