Mon, Jun 24, 2019 17:08होमपेज › Solapur › साखर उतार्‍यात श्री पांडुरंग तर उत्पादनात सहकारमहर्षी अव्वल

साखर उतार्‍यात श्री पांडुरंग तर उत्पादनात सहकारमहर्षी अव्वल

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 9:56PMपंढरपूर  : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात 32 साखर कारखान्यांव्दारे ऊस गाळप करण्यात येत  असून अडीच महिन्यात 9902115 मे.टन गाळप करीत 9941875 क्विटंल साखर पोती उत्पादन झाले आहे. श्रीपूर येथील श्री पांडुरंग सह.साखर कारखाना 11.27 साखर उतारा(रिकव्हरी) घेत आघाडीवर आहे तर अकलूज येथील सहकारमहर्षी कारखाना साखर उत्पादनात अव्वल आहे. जिल्ह्यात सरासरी 10.27 साखर उतारा मिळाला आहे.

उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भिमा नदी व उजनी कालव्याव्दारे पाणी मिळत असल्याने सोलापूर जिल्हा ऊस पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात 32 साखर कारखान्यांव्दारे ऊस गाळप सुरु आहे. गेल्या अडीच महिन्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. ऊस गाळपात विठ्ठलराव शिंदे माढा, सहकार महर्षी अकलूज, श्री पांडुरंग श्रीपुर, श्रीविठ्ठल गुरसाळे, बाबुराव पाटील अनगर, लोकमंगल आघाडीवर आहेत. तर कमला भवानी करमाळा, बबनराव शिंदे केवड, सीताराम महाराज खर्डी, संत कुर्मदास माढा साखर कारखान्यांचे गाळप कमी आहे.

सोलापूर जिल्ह्यात दि.18 जानेवारी अखेर पर्यंत गाळप झालेल्या साखर कारखान्यांचे  गाळप, उत्पादन व साखर उतारा याप्रमाणे- सिध्देश्‍वर साखर कारखाना कुमठे 366645 मे.टन गाळप, 309050 पोती, 8.64 उतारा, सहकारमहर्षी साखर कारखाना अकलूज 639528 मे.टन, 700150 पोती, 11.18 उतारा, श्री  विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर 479450 मे.टन, 488225 पोती, 10.46 उतारा, भीमा टाकळी 244925 मे.टन, 248250 पोती, 10.51 उतारा, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर 469661 मे.टन, 518560 पोती, 11.27 उतारा, श्री संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा 245910 मे.टन, 258550 पोती, 10.53 उतारा, आदिनाथ करमाळा 216490 मे.टन, 207000 पोती, 9.80  उतारा, चंद्रभागा भाळवणी 252930 मे.टन, 249700 पोती, 10.06 उतारा, श्री विठ्ठलराव शिंदे माढा 1030579 मे.टन, 1100600 पोती, 10.77 उतारा, बाबुराव पाटील अनगर 3880005 मे.टन, 400700 पोती, 10.42 उतारा, मकाई करमाळा  149695 मे.टन, 117700 पोती, 10.08 उतारा, संत कुर्मदास माढा 88165 मे.टन, 80830 पोती, 10.51 उतारा, सासवड शुगर माळीनगर 299000 मे.टन, 318290 पोती, 10.80 उतारा, लोकमंगल बीबीदारफळ 161825 मे.टन, 162350 पोती, 10.11 उतारा, विठ्ठल शुगर म्हैसगाव 266010 मे.टन, 275100 पोती, 10.49 उतारा, लोकमंगल भंडारकवठे 307510 मे.टन, 297350 पोती, 9.82 उतारा, सिद्धनाथ तिर्‍हे 369390 मे.टन, 358250 पोती, 9.86 उतारा, जकराया वटवटे 250290 मे.टन, 253750 पोती, 10.41 उतारा, भैरवनाथ शुगर विहाळ 297990 मे.टन, 266999 पोती, 9.49 उतारा, मातोश्री रुद्धेवाडी 210730 मे.टन, 205700 पोती, 9.95 उतारा, सीताराम महाराज खर्डी  49334 मे.टन, 51200 पोती, फॅबटेक शुगर बालाजी नगर 349165 मे.टन, 340700 पोती, 9.96 उतारा, भैरवनाथ शुगर लवगी तीन 269240 मे.टन, 255600 पोती, 9.66 उतारा, युटोपियन शुगर 327342 मे.टन, 354300 पोती, 10.87 उतारा, भैरवनाथ आलेगाव 266608 मे.टन, 267500 पोती, 10.21 उतारा, बबनराव शिंदे केवड 367649 मे.टन, 373650 पोती, जयहिंद शुगर आचेगाव 325180 मे.टन, 326820 पोती, 10.35 उतारा, गोकुळ शुगर धोत्री 263325 मे.टन, 284200 पोती, 11.02 उतारा, इंद्रेश्‍वर शुगर बार्शी 289730 मे.टन, 288950 पोती, 10.07 उतारा, कमला भावनी करमाळा 179227 मे.टन, 153100 पोती, विठ्ठल साई मुरूम 178400 मे.टन, 188650 पोती, 10.66 उतारा, आंबेडकर केशेगाव 312187 मे.टन, 310200 पोती, 9.88 उतारा मिळाला आहे.