Mon, Jul 13, 2020 00:49होमपेज › Solapur › संभाजी शिंदे यांच्या प्रयत्नाला यश; उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे आदेश 

संभाजी शिंदे यांच्या प्रयत्नाला यश; उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे आदेश 

Last Updated: Jun 02 2020 9:13AM
भाळवणी : पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांच्या मागणीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई-मेल द्वारे उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी लक्षत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ उजणीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची सुचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली होती. त्यानंतर त्यांनी आज ( दि. २ )  उजणीतून भीमा नदीत पाणी  सोडण्यात यावे असे आदेश दिले. त्यामुळे संभाजी शिंदे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आल्यामुळे भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सदर निवेदनात,  पंढरपूर येथील भीमा नदी सध्या कोरडी पडली असून या नदीवर भागातील शेती आणि जनावरांचा चारा अवलंबून आहेत. तसेच भाळवणी, कासेगाव, पंढरपूर शहर, शिरभावी (ता. सांगोला), मंगळवेढा पाणी पुरवठा योजना भीमा पत्रात पाणी शिल्लक नसल्यामुळे बंद आहेत. सध्या देशात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. एकीकडे शेती मालाला हमीभाव नाही. त्यातच कडक उन्हाळा वाढत आहे. त्यामुळे भीमा नदी कोरडी पडलेली आहे. शेतीला पाणी नाही, जनावरांना चारा, पाणी नाही. तरी याचा विचार करून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात लवकरात लवकर पाणी सोडून शेती, जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्यात यावा अशी मागणी ई-मेल द्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आली होती. 

संभाजी शिंदे यांनी ई-मेल केलेल्या निवेदन तात्काळ दखल घेऊन थेट मातोश्री वरून शिंदे यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करून भीमा काठची पाण्याची परिस्थिती जाणून घेतली. काल (दि.१) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तात्काळ भीमा नदीच्या पात्रात उजणीतून पाणी सोडावे अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली. त्यानंतर दुपारी २ च्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आज (दि.२) उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

त्यामुळे संभाजी शिंदे यांनी केलेल्या मागणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन भीमा नदीत आजच पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.