Thu, Jul 18, 2019 21:28होमपेज › Solapur › ‘हर्र बोला हर्र’च्या जयघोषात 68 लिंग पदयात्रा

‘हर्र बोला हर्र’च्या जयघोषात 68 लिंग पदयात्रा

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 9:47PMसोलापूर ः प्रतिनिधी 

ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्‍वर यांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांचे ‘एकदा हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्‍वर महाराज की जय’ या जयघोषात अभिषेक करुन दर्शन घेण्यात आले. 68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हीजन यांच्यावतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

श्रावणातील चौथ्या रविवारी सकाळी बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली  निघालेल्या या पदयात्रेत  वीरशैव व्हीजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले, 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी, पावडेप्पा भूशेट्टी , डॉ. संगमेश्‍वर नीला,  नागनाथ सराटे, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, मुंबई पोलिस अधिकारी प्रियांका सरडे, नागनाथ चांगले, तम्मा पोतदार, संजय साखरे, आनंद दुलंगे, अरुण पाटील, राजेश नीला, सपना दहीहंडे, उज्ज्वला शिरूर, निर्मला बगले सहभागी झाले होते. 

गेल्या 42 वर्षांपासून ही पदयात्रा अखंडितपणे चालू आहे. यामध्ये शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथील 300 भाविकांचा समावेश होता. विशेष करुन या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता.

बाळीवेस येथे दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यावतीने सहभागी भाविकांना फराळ व चहा देण्यात आला. पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे, स्वामी, विश्‍वनाथ मंगरुळे, श्रीमंत मेरु, लक्ष्मण वडलाकोंडा, गौरी जेऊरे, वैशाली मोतगुंडे, अंजली कलशेट्टी, लिंगराज कामशेट्टी, रुपाली हिरेमठ यांनी परिश्रम घेतले.