Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Solapur › संघाच्या स्वयंसेवकांना काठ्या घेऊन सीमेवर पाठवावे-शरद पवार

संघाच्या स्वयंसेवकांना काठ्या घेऊन सीमेवर पाठवावे-शरद पवार

Published On: Feb 18 2018 2:04AM | Last Updated: Feb 18 2018 12:23PMपंढरपूर : प्रतिनिधी

या देशातील सैन्याने देशाची प्रतिष्ठा, सीमा, रक्षण करण्यासाठी पडेल ती किंमत मोजलेली आहे. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी आपली सेना आहे. केंद्राच्या गृहमंत्र्यांनी  सीमेवर संघाच्या लोकांना काठ्या घेऊन, हाप पँट घालून जाऊ द्या, आतंकवाद्यांशी सामना करण्यासाठी जाऊ द्या,  म्हणजे भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर दिली. ते वाडी कुरोली ( ता.पंढरपूर) येथे पत्रकारांशी बोलत होते.

Image may contain: text

...म्हणून मंत्रालयात आत्महत्या करावी वाटते

मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीसंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, संबंध राज्यातील लोकांना मंत्रालयात आत्महत्या करावी असे का वाटते?  कारण इथे त्याला न्याय मिळत नाही म्हणून तो मंत्रालयासमोर आत्महत्या करण्यासाठी जातोय. 

मनमोहनसिंग सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या 50 टक्के शिफारशी लागू केल्या  

स्वामीनाथन आयोगाची स्थापना यु.पी.ए. सरकारच्या काळातच झाली. त्यांनी केलेल्या शिफारशीपैकी निम्म्या शिफारशी तत्कालिन मनमोहनसिंग सरकारने स्विकारल्या. उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा देण्यासाठी राज्यांना विश्वा सात घेण्याची सूचना काही राज्यांकडून आली होती. त्यादरम्यान निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्या शिफारशींची पुर्णपणे अंमलबजावणी करता आली नाही.  मात्र, स्वामीनाथन आयोगाबाबत मनमोहनसिंग सरकार गंभीर होते. जेव्हा पुढे आम्ही एकत्रीत निवडणुकीचा जाहीरनामा  तयार करू तेव्हा त्यात या शिफारशीचा समावेश करू. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचा राहिलेला भाग आहे तो राज्य सरकारला विश्वाफसात घेऊन पुर्ण करण्यासाठी पुढची पावले टाकू, असे पवार म्हणाले.  यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. 

साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षीय भाषणातील मुद्यांचे कौतुक करून खा. पवार यावेळी म्हणाले की, ज्या घटकांनी समाजात एक आकसाची भावना वाढवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्या पायाचं दर्शन घेण्यात धन्यता मानणारे लोक सत्तेत आहेत त्यामुळे कारवाई किती प्रमाणात करतात हे पहावं लागले.