Wed, Apr 24, 2019 11:57होमपेज › Solapur › विकासाच्या मुद्यावर काम करणे हिताचे : खा. बनसोडे

विकासाच्या मुद्यावर काम करणे हिताचे : खा. बनसोडे

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 10 2018 1:18AMमोहोळ : वार्ताहर

निवडणुकीपुरते राजकारण अन् विकासाच्या मुद्यावर काम करणे हा अजेंडा समोर ठेवून काम केल्यास ते सर्व समाजाच्या हिताचे ठरेल, असे प्रतिपादन सोलापूरचे भाजप खा. अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी केले. 

अंकोली (ता. मोहोळ) येथे मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत मंजूर असलेल्या विविध कामाच्या भूमीपूजनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते शुगरचे चेअरमन तथा जि.प. सदस्य बाळराजे पाटील हे होते. 

यावेळी खा. बनसोडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. पुढे बोलताना खा. बनसोडे म्हणाले की, या गावासाठी सुमारे 13 लाख रुपयांचा निधी स्वत:च्या खासदार फंडातून दिला आहे. तसेच भविष्यात अनेक प्रश्‍न वेगवेगळ्या पातळीवर सोडविणार असल्याचे सांगितले. 

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत सुतकर, माजी सभापती भारत गायकवाड, जि.प. सदस्य प्रा. शिवाजी सोनवणे, पं.स.सदस्य ज्ञानेश्‍वर चव्हाण, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल मोरे, भीमाचे माजी संचालक शिवाजी चव्हाण, सरचिटणीस प्रकाश बचुटे, राहुल क्षीरसागर आदी पदाधिकारी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

वेळी बाळराजे पाटील यांनी हा कार्यक्रम ना राष्ट्रवादीचा ना भाजपाचा आहे. तर हा कार्यक्रम फक्त विकासाचा असल्याचे असे मत व्यक्त केले. तसेच खा. बनसोडे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून त्यांना मते न देणार्‍या गावांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले. 

यावेळी  आप्पासाहेब पाटील, संचालक अस्लम चौधरी, संचालक अंगद भुसे, पेनूरचे उद्योजक सागर चवरे, रामदास चवरे, लक्ष्मण चोरगे, संजय वाघमोडे, काशीम मुल्ला,  खासदार प्रतिनिधी संतोष नामदे, अशोक क्षीरसागर, दिलीप कदम आदींसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.